Nashik : जलयुक्त शिवार 2.0 चा आराखडा 204 कोटींचा, पण निधीचे काय?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendermama

नाशिक (Nashik) : जलयुक्त शिवार २.० योजनेचा (Jalyukt Shivar 2.0) नाशिक जिल्हा आराखडा तयार झाला असून आता कामनिहाय अंदाजपत्रक (Budget) तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात २३१ गावांमध्ये या योजनेतून २०४ कोटी रुपयांची २९४३ कामे करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली असून एकट्या नाशिक जिल्ह्याचा आराखडा २०४ कोटी रुपयांचा असल्यामुळे या कामांसाठी निधी मिळणार कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis
Nashik : मनमाडच्या एमआयडीसीसाठी होणार 177 हेक्टर भूसंपादन

राज्यात मागील वर्षी पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर या वर्षापासून सरकारने जलयुक्त शिवार २.० योजना राबवण्यास सुरवात केली आहे. या योजनेसाठी सरकारने नवीन अटी व नियमावली तयार केल्या असून, जलयुक्त शिवार योजना न राबवलेल्या गावांमध्ये ही योजना राबवल जाणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील २३१ गावांचा या योजनेचा समावेश केला आहे.

जिल्हास्तरावर या योजेनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून मृद व जलसंधारणचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यात २३१ गावांमध्ये २९४३ कामे निश्चित करण्यात आली आहेत. या कामांमध्ये प्रामुख्याने माती बांध व सिमेंट बांध या कामांचा समावेश आहे.

कामांच्या रकमेनुसार विचार केल्यास जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचा आराखडा सर्वाधिक ६९.४८ कोटी रुपयांचा आहे. त्या खालोखाल मृद व जलसंधारण विभागाने ६३.८३ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. वनपरीक्षेत्र विभागाचा ३५.१३ कोटी रुपये, भूजल सर्वेक्षण विभागाचा १२ कोटी रुपये व कृषी विभागाने २३.५४ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे.

Devendra Fadnavis
Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत अजितदादांनी दिली Good News!

१०९ कोटी रुपये कोठून आणणार?
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणसाठी तरतूद केलेल्या निधीतून काही रक्कम जलयुक्त शिवारसाठी वळवण्याबाबत चर्चा असल्याचे समजते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मृदा व जलसंधारणसाठी कृषी विभागाला सहा कोटी रुपये, वन विभागाला २७.५ कोटी रुपये, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला ३३ कोटी रुपये, स्थानिक स्तर १५ कोटी रुपये असे ८१.५ कोटी रुपये निधी जलसंधारणाच्या कामांसाठी मंजूर केले आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी रुपयांपैकी दायीत्व वजा जाता कामांसाठी २८ कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे.

तसेच आदिवासी विकास विभागाकडून मृदा व जलसंधारणच्या कामांसाठी आणखी स्थानिक स्तर व जिल्हा परिषद यांना मिळून आणखी २० कोटी रुपये निधी उपलब्ध होऊ शकतो. याचा विचार केल्यास जलसंधारणच्या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडू न या वर्षी जास्तीत जास्त ९५ कोटी रुपये उपलब्ध होऊ शकणार आहेत. यामुळे या आराखड्यातील उर्वरित कामांसाठी १०९ कोटी रुपये कसे उभे करायचे, याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे दिसत आहे.

Devendra Fadnavis
Nashik : आयटी पार्कची जागा बदलून उद्योगमंत्री सामंतांची राजकीय फोडणी

कृषी विभाग करणार सर्वाधिक कामे
विभाग                   कामांची संख्या

कृषी                      १३१९
मृद व जलसंधारण     १८३
जि.प. जलसंधारण      ३२५
भूजल सर्वेक्षण          ३००
 वनपरीक्षेत्र               ७३६


नाशिक जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार २.० योजनेचा २०४ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता विभागाकडून प्रत्येक कामनिहाय अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे. यानंतर या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर पुढील काम केले जाईल.
- हरिभाऊ गिते, कार्यकारी अभियंता, मृद व जलसंधारण विभागा, नाशिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com