SPPU
SPPUTendernama

Nashik : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसमध्ये Tender Scam? कोणी केला आरोप?

Published on

नाशिक (Nashik) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नाशिक कॅम्पसच्या वाढीव बांधकामाच्या मंजुरी व निधीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. नाशिक उपविभागीय कार्यालयाशी संबंधित कामे ठेकेदारांना (Contractor) विनाटेंडर दिले जातात. तसेच या कामांमध्ये टेंडर घोटाळा (Tender Scam) झाला आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी नाशिकला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप संघटनांनी केला. यामुळे कॅम्पस निधीसह सहायक कुलसचिव नियुक्तीचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

SPPU
Nagpur ZP: मंजूर 256 कोटी पण मिळाले फक्त 45 कोटी; ग्रामीण भागातील विकासकामांना फटका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सदस्यांनी अहमदनगर आणि नाशिक कॅम्पसच्या निधीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दरम्यान विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषदेत ठराव करूनही विद्यापीठाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याची विद्यार्थ्यांमध्ये भावना आहे. यामुळे सिनेट सदस्यांपाठोपाठ १६ विद्यार्थी संघटना कुलगुरूंविरोधात एकवटल्या आहेत.

काही ठराविक लोकांच्या मर्जीनुसार विद्यापीठ चालवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी कुलगुरूच रिमोटने विद्यापीठाचे कामकाज चालवत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विनाटेंडर मर्जीतील ठेकेदारांना कामे दिले आहेत. टेंडर प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

SPPU
Pune : नव्या वर्षात घरांच्या किमती वाढणार? कारण...

डॉ. गोसावी यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही नाशिक कॅम्पसला भेट दिलेली नाही. यामुळे  नाशिक कॅम्पसला पुरेसा निधी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.  

'माजी कुलगुरुंचा हस्तक्षेप नाही'
दरम्यान, विद्यापीठाकडून नियमाप्रमाणे कामकाज सुरू आहे. नगर आणि नाशिक कॅम्पसला नियमानुसारच निधी दिला जात आहे. निधी वाटपात कोणताही दुजाभाव नाही. दैनंदिन कामकाजात माजी कुलगुरूंचा हस्तक्षेप नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी म्हटले आहे.

Tendernama
www.tendernama.com