Nashik Railway: मध्य रेल्वेच्या बैठकीत खासदार वाजेंनी मांडले रेल्वेचे शंभरावर प्रश्न

Nashik Road Railway Station
Nashik Road Railway StationTendernama
Published on

नाशिक (Nashik): मुंबई येथील मध्य रेल्वे मुख्यालयातील त्रैमासिक आढावा बैठकीत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक जिल्ह्यातील रेल्वे विकासाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज व्यक्त केली. तसेच त्यांनी अत्यंत ठाम आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास तातडीने करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी नाशिकच्या रेल्वेप्रश्नांशी संबंधित १०० हुन अधिक प्रश्न मांडून ते तातडीने सोडवण्यावर भर दिला.

Nashik Road Railway Station
Bullet Train: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रखडली, आता बुलेट ट्रेनचा नवा प्रस्ताव?

मध्य रेल्वे मुख्यालयात झालेल्यात्रैमासिक आढावा बैठकीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकमधील रेल्वेशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावण्याची आग्रह धरला. त्यांनी शंभरहुन अधिक मागण्यांचे निवेदन सादर केले.  त्या निवेदनात प्रामुख्याने नवीन रेल्वे गाड्या, विद्यमान गाड्यांना नाशिक रोड येथे थांबा, लोकल सेवा, स्टेशन आधुनिकीकरण, रेल्वे उड्डाणपूल, भूयारी मार्ग, मालवाहतूक सुविधा, लॉजिस्टिक्स पार्क, वंदे भारत उत्पादन केंद्र, रेल्वे कार्यशाळा विस्तार आणि भविष्यातील रेल्वे प्रकल्प, अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.

नाशिक रोड हे मध्य रेल्वेतील सर्वाधिक महसूल देणाऱ्या स्थानकांपैकी एक असूनही अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या येथे थांबत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिक रोड आणि ओढा रेल्वे स्थानकांचे व्यापक आधुनिकीकरण मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याची मागणी करताना अतिरिक्त विशेष गाड्या, जादा डबे आणि लाखो भाविकांच्या सोयीसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी त्यांनी केली.

Nashik Road Railway Station
Nashik Shirdi Railway: नाशिक-पुणे ऐवजी नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गाला गती; 'त्या' 34 गावांत भूसंपादनाचे आदेश

खासदार वाजे यांनी मांडलेले विषय

नाशिक रोड येथे दुरांतो, हमसफरसह १५ हून अधिक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देणे तसेच देवळाली कॅम्प येथील पूर्वीचे थांबे पुन्हा सुरू करावी.
नाशिक–कोल्हापूर दैनंदिन एक्स्प्रेस, नाशिकहून तिरुपती, अयोध्या, वाराणसी, पुरी, रामेश्वरम, अजमेर, कटरा आदी धार्मिक स्थळांसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करावी.
पंचवटी व राज्यराणी एक्स्प्रेससाठी अतिरिक्त डबे, स्वतंत्र रेक, वेळेचे पालन आणि नाशिक–मुंबई मेमू लोकल सेवा सुरू करावी.
नाशिक रोड व ओढा स्थानकांचा कुंभमेळ्यापूर्वी विकास, अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास, प्लॅटफॉर्म सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी व डिजिटल सुविधा उपलब्ध करावी.
गोरेवाडी, ओढा, घाटी परिसरात रेल्वे अंडरपास, पादचारी पूल, स्कायवॉक तसेच धोकादायक रेल्वे क्रॉसिंगवरील उपाययोजना कराव्यात.
एकलहरे येथे वंदे भारत उत्पादन केंद्र, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क, रेल्वे टेक्नॉलॉजी पार्क व स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारावे.
कसारा–मनमाड तिसरी-चौथी लाईन, नाशिक–दहाणू रेल्वेमार्ग, नाशिक–शिर्डी रेल्वे, पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, मनमाड–इंदूर प्रकल्पांना गती द्यावी.
पाडळी स्थानक लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित करावे, खत रेकला प्राधान्य, कृषी मालासाठी अतिरिक्त लीजिंग पॉइंट उपलब्ध करावी.
नाशिक रोड व कसारा येथे प्रीपेड ऑटो-टॅक्सी सुविधा, मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब आणि पार्किंग व्यवस्था विकसित करावी.

Tendernama
www.tendernama.com