Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

Nashik Neo Metro: फडणवीसांच्या पुढाकारानंतर पालिकेचा मोठा निर्णय..

नाशिक (Nashik) : केंद्र शासनाकडून गत चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निओ मेट्रोला (Neo Metro) गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुढाकार घेतल्यानंतर महापालिकेनेही गंगापूररोड येथे मेट्रोला डेपो देण्यासाठी गंगापूररोडवरील कानिटकर उद्यानालगत तीन एकर जागा व सिन्नर फाटा येथील अकरा एकर जागा देण्याची तयारी दाखवली आहे.

केंद्रांकडून ३२ किमीच्या प्रस्तावित निओ मेट्रोला चालना मिळत नसल्यामुळे फडणवीस यांनी दहा किमी अंतरावर नाशिकरोड ते मुंबईनाका व पुढे गंगापूर अशा दोन टप्प्यांसाठी शासनाने ११०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवली आहे.

Devendra Fadnavis
सिंहस्थापूर्वी नाशिकमध्ये होणार 625 कोटींचे काँक्रिटरस्ते

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील पहिली टायरबेस निओ मेट्रो नाशिकला देण्याची घोषणा केली होती. या प्रकल्पास २९ ऑगस्ट २०१९ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर २०२०-२०२१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद केली. मात्र, प्रत्यक्षात पुढे कोणतीही प्रगती झाली नाही.

त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत नाशिक येथे झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन आठवड्यांत निओ मेट्रोचा फैसला होईल, असे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही या प्रकल्पाला गती मिळत नसल्यामुळे फडणवीस यांनी केंद्र शासनाला पत्र लिहून राज्य सरकार स्वनिधीतून नाशिकरोड ते मुंबईनाका व पुढे गंगापूर अशा दोन टप्प्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे सांगितले. 

Devendra Fadnavis
PWD मंत्र्यांची नाशिककरांना गुड न्यूज; 'या' मार्गाचे विस्तारीकरण

फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतर राज्य शासनाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. त्यानंतर दिल्ली येथे मेट्रो संदर्भात बैठक देखील झाली. त्यानंतर नाशिक महापालिका मुख्यालयात मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी भेट देत जागेसंदर्भात मागणी केली. गंगापूर भागात निओ मेट्रोला जागा मिळत नसल्याने अखेर महापालिकेने कानेटकर उद्यानालगतचा तीन एकर मोकळा भूखंड देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचबरोबर सिन्नर फाटा येथील सिटीलिंक कंपनीची जागादेखील महामेट्रोला देऊन तेथील डेपो चेहेडी येथे हलविला जाणार आहे.

सिन्नर फाटा येथे मल्टी मॉडेल हब तयार केले जाणार आहे. त्यासाठी सिटीलिंकच्या जागेची मागणी करण्यात आली आहे. सिटीलिंकचा डेपो भविष्यात चेहेडी येथील ट्रक टर्मिनस जागेवर हलवला जाणार आहे. गंगापूर येथे मेट्रोचा टर्मिनल राहणार आहे. तेथे तीन एकर जागा दिली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com