

नाशिक (Nashik): नाशिकमधील म्हाडा घरकुल घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या शिफारशीनुसार म्हाडाने बनावट कागदपत्रांद्वारे तुकडे केलेल्या आणखी ५९ भूखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार पूर्णपणे थांबविण्याची मागणी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (पुणे) यांच्याकडे केली आहे. म्हाडाच्या पत्रामुळे यापूर्वी ४९ भूखंडांवरील व्यवहार थांबविण्यात आले आहेत. त्यात आता आणखी ५९ प्रकरणांची भर पडली आहे.
राज्य सरकारच्या २०१३ च्या धोरणानुसार नाशिक महापालिका हद्दीत ४ हजार एकर व त्यापेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्प अथवा लेआऊटमधील २० टक्के सदनिका अथवा भूखंड हे म्हाडाकडे वर्ग करण्याच्या धोरणाच्या अंमलबजावणीतील अनियमितता झाली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीच्या तपासात १०८ पैकी ४९ प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडांचे नियमबाह्य विभाजन झाल्याचे आढळून आले. त्यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी शिवदास आवळकंठे यांनी २९ मे २०२६ ला पत्र पाठवून या भूखंडांवरील व्यवहार पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने उर्वरित ५९ प्रकरणांची गावनिहाय माहिती, सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, पोटहिस्सा आदेश आणि अंमलबजावणीची तारीख यासह सविस्तर अहवाल म्हाडाकडे सादर केला.
त्यानंतर म्हाडाने १५ जून २०२६ ला नोंदणी महानिरीक्षकांना पत्र पाठवून या ५९ भूखंडांवरील सर्व व्यवहार तातडीने थांबविण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये ८ नोव्हेंबर २०१३ नंतर तुकडे केलेले आणि मंजूर अभिन्यासामध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेसाठी क्षेत्र वगळले ४६, तुकडे केलेले पण अभिन्यास मंजूर न झालेले ३९ आणि सीटीएस असलेल्या १२ भूखंडांचा समावेश होता.
आता चौकशी पूर्ण होण्यापूर्वी तृतीय पक्षाचे हितसंबंध निर्माण होऊ नयेत यासाठी थेट व्यवहारच थांबविण्याची मागणी म्हाडाने केली आहे. म्हाडाच्या या पावलामुळे संबंधित भूखंडांवर सुरू असलेले सर्व व्यवहार थांबणार आहेत.
या सर्व्हे क्रमांकांचे थांबवले व्यवहार
१५२/२, १६५/४, १३८/३, १२९/१, १६४/२, १०५/१ अ, १९३/२, १३७/२, २८७, १६३/३/३/क, १६४/१/अ, १ ब, १क, २५०, ३/१, ११३/१/३/क, ११३/१/५ ड, ११३/१/६ फ, १३९/२, १३७/२, २८७, १६३/३/क, १६४/१/अ, २५०, ३/१, ११३/१/३/क,
७३/५, ५१, ५२/१, २४८ १ ते ११, १२, १०, ११९१/२, ५९७/१/१, १८४४, ११०१/४, ७१७, ७१८, ७००/२/अ, १०९८/१, १०८३/२, ५९४, २९८, ४१६/१, ४६१/२, ९१/३, ९१/३/१, ९१/३/२, ७३/१, ७३/१/१, ७३/१/२, ७३/१/३, ७३/१/४, ७३/१/५, ७३/१/६, २७८/१/३/१, ८९०/२अ/१ ते ४, ५४/१, ९३/२, ५६/१, १३/२, ७०/१, १६१/४/ड/१, ४८/अ, १६२/३/१, १५८/१०, १६०, ७२५/१पै/१ व २, ६५/५, २५६/१ व २, २५६/ब/१, २५६/ब.