Nashik: आधीचे सायकल ट्रॅक धूळखात पडून; मग आणखी 2 हवेत कशाला?

Cycle Track Nashik
Cycle Track NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक शहरात स्मार्ट सिटी (Nashik Smart City) कंपनीने उभारलेल्या दोन सायकल ट्रॅकचा उपयोग सध्या वाहने उभी करण्यासाठी होत असताना आता १६ किलोमीटरचे नवीन सायकल ट्रॅक उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनकडून स्मार्ट सिटी कंपनीने चाचणी करून घेऊन सायकलस्वारांना येणाऱ्या अडचणीही समजून घेतल्या आहेत. आधी उभारलेले सायकल ट्रॅक सायकल चालकांच्या उपयोगाला येत नसतील, तर आणखी खर्च कशाला, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Cycle Track Nashik
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पुणेकरांची दिवाळी गोड!

केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंज या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे. त्यासाठी नाशिक शहरात अशोक स्तंभ ते गंगापूर रोडवरील जेहान सर्कलपर्यंत व पाईपलाईन रोड ते महिंद्रा सर्कल असे दोन ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या दोन्ही मार्गांवर एकूण १६ किलोमीटरचे दोन सायकल ट्रॅक उभारले जाणार आहेत. सायकल ट्रॅक उभारल्यानंतर सायकलस्वारांना काय अडचणी येऊ शकतील, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी नाशिक सायक्लिस्ट फाउडेशच्या सहकार्याने यामार्गांवर बॅरिकेडस्‌ टाकून त्याची चाचणी घेतली. तसेच सायकलस्वारांचे अनुभव समजून घेण्यात आले.

Cycle Track Nashik
'स्थिगिती सरकार'च्या निर्णयामुळे विकासालाच ब्रेक; ठेकेदारही अडचणीत

नाशिक शहरात सायकल चळवळ चांगली रुजली आहे. हजारो सायकलस्वार रोज नाशिकच्या परिघात सायकल चालवताना दिसत असतात. तसेच त्यांच्याकडून वेगवेगळ्या निमित्ताने सायकल चालवण्याचा प्रचार - प्रसार करण्यासाठी सायकल सहलींचे आयोजन केले जाते. यामुळे सायकलींचे शहर अशी नाशिकची नवी ओळख बनत चालली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने काही वर्षांपूर्वी शहरात सायकल चालवण्याचे प्रमाण वाढावे यासाठी पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प आणला होता. त्यात लोकांना सायकली भाडेतत्वाने दिल्या जात होत्या. मात्र, महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीने आपले कर्तव्य पार पाड पाडले. मात्र, नागरिकांनी अनेक सायकली लंपास केल्या. तसेच सायकली नादुरुस्त केल्यामुळे तो प्रकल्प गुंडाळला गेला.

Cycle Track Nashik
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; नाशिक सिव्हिलचे 'ते' टेंडर अखेर रद्द

स्मार्ट सिटी कंपनीने अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका व त्र्यंबक नाका ते मायको सर्कल या भागात यापूर्वी दोन सायकल ट्रॅक उभारले आहेत. मात्र, या दोन्ही रस्त्यांवरील सायकल ट्रॅकची जागा वाहनचालकांकडून चारचाकी उभ्या करण्यासाठी सर्रासपणे वापरली जात आहे. यामुळे या सायकलट्रॅकवरून कोणालाही सायकल चालवणे शक्य होत नाही.

Cycle Track Nashik
निफाड साखर कारखाना चालविण्याचे 25 वर्षांचे टेंडर 'या' कंपनीकडे

आधीच्या सायकल ट्रॅकची अशी अवस्था असताना स्मार्ट सिटी कंपनीने दुसऱ्या दोन मार्गांवर १६ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सायकल ट्रॅक उभारताना त्या मार्गांचा उपयोग सायकल चालवण्यासाठीच होईल, हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे, हा प्रश्‍न अनुत्तरित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com