Nashik STP Solar Project: पाच केंद्रांसाठी 14 कोटींचे टेंडर

आगरटाकळी, तपोवन, पंचक, चेहेडी आणि पिंपळगाव खांब येथे ऑन-ग्रिड सोलर पीव्ही प्रणाली; पाच वर्षांची देखभालही ठेकेदाराकडे
Solar Panel
Solar PanelTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांचा वीजखर्च कमी करण्यासाठी पाच एसटीपी परिसरांत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. आगरटाकळी, तपोवन, पंचक, चेहेडी आणि पिंपळगाव खांब येथील एसटीपींवर हे प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहेत. पाचही कामांची एकत्रित अंदाजित किंमत सुमारे १४ कोटी ६८ लाख रुपये आहे.

Solar Panel
MSRTC Redevelopment: एसटीच्या 147 बसस्थानकांना मिळणार ‘आयकॉनिक’ रूप

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याचा एक भाग म्हणून शहरातील सहा मलनिस्सारण केंद्रांचे अद्ययावतीकरण आणि क्षमतावाढीची कामे सुरू आहेत. या केंद्रांसाठी होणारा वीजवापर आणि त्यावरील खर्च कमी करण्यासाठी पाच एसटीपींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टेंडरनुसार एसटीपी परिसरात ऑन-साइट, ऑन-ग्रिड सोलर पीव्ही प्रणाली उभारली जाणार आहे. सौर पॅनेलद्वारे निर्माण होणारी डीसी वीज इन्व्हर्टरच्या माध्यमातून एसीमध्ये रूपांतरित करून महापालिकेच्या विद्युत प्रणालीशी जोडण्यात येणार आहे.

Solar Panel
Karanja Fishing Harbour: दुसऱ्या टप्प्यासाठी 151 कोटींचा प्रस्ताव; 6,600 मच्छीमारांना लाभ

प्रकल्पनिहाय अपेक्षित खर्च

आगरटाकळी येथील ७० आणि ४० एमएलडी क्षमतेच्या एसटीपींसाठी ३ कोटी ९९ लाख २ हजार ५३२ रुपये, तर तपोवनातील ७८ आणि ५२ एमएलडी एसटीपींसाठी ३ कोटी ९८ लाख १० हजार ८७९ रुपये खर्च अपेक्षित आहे.

पंचक येथील ७.५, २१ आणि ३२ एमएलडी क्षमतेच्या एसटीपींसाठी २ कोटी ७३ लाख ९६ हजार ९७९ रुपये, चेहेडीतील २० आणि २२ एमएलडी एसटीपींसाठी १ कोटी ९८ लाख ९८ हजार ३०८ रुपये आणि पिंपळगाव खांब येथील ३२ एमएलडी एसटीपीसाठी १ कोटी ९८ लाख ५४ हजार ४३१ रुपये खर्च अपेक्षित आहे.

Solar Panel
ST Bus Depot: एसटी डेपो, मेट्रो आणि रेल्वेचे होणार एकत्रीकरण; मुंबईसह राज्यात 'मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब' उभारण्यावर भर

नेट मीटरिंगची तरतूद

सौरऊर्जेचा वापर एसटीपींसाठी करण्यात येणार असून, टेंडरमध्ये नेट मीटरिंग आणि वीज ग्रीड जोडणीचीही तरतूद आहे. उपलब्धतेनुसार अतिरिक्त सौरऊर्जा ग्रीडमध्ये पाठवता येणार आहे.

सोलर पॅनेल आणि इन्व्हर्टरच्या स्थापनेसह पाच वर्षांची ऑन-साइट वॉरंटी, सर्वसमावेशक देखभाल आणि पॅनेलच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असेल. प्रकल्पाच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टिमही उभारण्यात येणार आहे.

Solar Panel
MHADA Pune: म्हाडाची घरे थेट खरेदी करता येणार? प्रतिसाद न मिळालेल्या सदनिकांसाठी नवा निर्णय

Key Points

  • नाशिकमधील पाच एसटीपींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार.

  • पाच कामांची एकत्रित अंदाजित किंमत सुमारे १४.६८ कोटी रुपये.

  • आगरटाकळी आणि तपोवन येथील प्रकल्पांसाठी प्रत्येकी सुमारे चार कोटींचा खर्च.

  • ऑन-साइट, ऑन-ग्रिड सोलर पीव्ही प्रणाली उभारली जाणार.

  • सौरऊर्जा महापालिकेच्या विद्युत प्रणालीशी जोडण्यात येणार.

  • नेट मीटरिंग आणि वीज ग्रीड जोडणीची तरतूद.

  • ठेकेदाराकडे पाच वर्षांची वॉरंटी आणि सर्वसमावेशक देखभाल.

  • सोलर पॅनेलच्या पाच वर्षांच्या स्वच्छतेचाही कामात समावेश.

  • प्रकल्पाच्या कामगिरीसाठी रिमोट मॉनिटरिंग सिस्टिम उभारणार.

Tendernama
www.tendernama.com