नाशिकच्या कॉलनी रस्त्यांसाठी शासनाकडे 1,355 कोटींची मागणी; 31 प्रभागांचा समावेश

प्रभाग २७ आणि २८ साठी प्रत्येकी ८५ कोटींहून अधिक निधी प्रस्तावित; खोदकामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेचा DPR तयार
Good News To Nashikkar
Nashik CityTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिका हद्दीतील खोदकामांमुळे खराब झालेल्या कॉलनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ हजार ३५५ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मागण्याची तयारी करण्यात आली आहे. महापालिकेने शहरातील सर्व ३१ प्रभागांतील कॉलनी रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला असून, त्याआधारे शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

Good News To Nashikkar
Nashik TDR Policy: नाशिकमधील घरांच्या किमती कमी होणार? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?

महापालिका हद्दीतील कॉलनी अंतर्गत रस्त्यांची खोदकामांमुळे झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी आता तब्बल १ हजार ३५५ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मागविण्यात येणार आहे. शहरातील सर्व ३१ प्रभागांतील कॉलनी रस्त्यांसाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, त्याआधारे शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. या अहवालानुसार प्रभाग क्रमांक २७ आणि २८ साठी सर्वाधिक निधीचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातील अनेक कॉलनी रस्ते महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) तसेच विविध सेवा-सुविधांच्या वाहिन्यांसाठी वारंवार खोदण्यात आले आहेत. खोदकामानंतर रस्त्यांची योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्याने अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Good News To Nashikkar
Nashik Potholes: आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा; गिरीश महाजनांचा महापालिकेला अल्टिमेटम

यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेला कॉलनीरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून निधी मागणी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने डीपीआर तयार केला असून त्यात ३१ प्रभागांतील कॉलनी रस्त्यांसाठी १,३५५.३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

प्रभागनिहाय निधीमध्ये मोठी तफावत असून, प्रभाग २७ साठी ८५.७६ कोटी, तर प्रभाग २८ साठी ८५.७२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे दोन्ही प्रभाग निधीच्या दृष्टीने आघाडीवर आहेत. याशिवाय प्रभाग ३ साठी ३७.६० कोटी, प्रभाग ६ साठी ५७.४७ कोटी, प्रभाग ८ साठी ५०.३५ कोटी, प्रभाग ९ साठी ५०.५७ कोटी, प्रभाग १० साठी ५२.७३ कोटी, प्रभाग १२ साठी ६३.३३ कोटी, प्रभाग १५ साठी ४०.५५ कोटी, प्रभाग १६ साठी ४६.३० कोटी आणि प्रभाग ३१ साठी ७२.३४ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे.

Good News To Nashikkar
Nashik: एमएनजीएलच्या मनमानीपुढे महापालिका प्रशासन हतबल झालेय का?

मुख्यमंत्री फडणवीस यांचेही निर्देश
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कॉलनी रस्त्यांसाठी विशेष निधीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने विविध भागांतील रस्त्यांची पाहणी करून त्यांचा डीपीआर तयार केला आहे.

आता हा प्रस्ताव शासनाकडे सादर करून निधी उपलब्ध करून घेण्याचे नियोजन आहे. शासनाकडून प्रस्तावित निधी मंजूर झाल्यास शहरातील मोठ्या संख्येने कॉलनी रस्त्यांची दुरवस्था संपणार आहे.

Good News To Nashikkar
Nashik Municipal Corporation: रस्ते तोडफोड शुल्काचा हिशेब जुळेना; 290 कोटींचा घोटाळा?

Key Points

  • नाशिकच्या ३१ प्रभागांतील कॉलनी रस्त्यांसाठी DPR तयार.

  • एकूण १,३५५.३५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित.

  • प्रभाग २७ साठी ८५.७६ कोटी रुपये.

  • प्रभाग २८ साठी ८५.७२ कोटी रुपये.

  • MNGL आणि इतर सुविधांच्या वाहिन्यांसाठी वारंवार खोदकामामुळे रस्ते खराब.

  • पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर DPR तयार.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही विशेष निधीची मागणी.

  • निधी मंजूर झाल्यास कॉलनी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करता येणार.

Tendernama
www.tendernama.com