
नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी (Nashik Smart City) कंपनीकडून २०१८ मध्ये घेतलेली कामे २०२३ पर्यंत पूर्ण न करणाण्या बी. जी. शिर्के या ठेकेदार (Contractor) कंपनीने बांधकाम साहित्याचे दर वाढले म्हणून स्मार्ट सिटीवर ६० कोटींचा दावा ठोकला आहे.
सध्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीने बांधकामाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने स्मार्टसिटीकडे अतिरिक्त ६० कोटी देण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव कंपनीच्या बोर्डाने फेटाळल्यानंतर शिर्के कंपनीने लवादाकडे धाव घेतल्याचे सांगितले जाते.
नाशिक स्मार्ट सिटी कंपनीची गावठाण विकासअंतर्गत बी. जी. शिर्के या कंपनीने जवळपास दोनशे कोटींची कामे हाती घेतली आहेत. ही कामे २०१८ मध्ये असलेल्या बांधकाम दरानुसार या कंपनीला देण्यात आली आहेत. एकूण १७५ रस्त्यांपैकी जवळपास ७५ रस्त्यांचीच कामे होऊ शकली आहेत. कोरोनामुळे संबंधित कंपनीला आतापर्यंत ही कामे करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ मिळाली आहे.
वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही काम पूर्ण न केल्याने स्मार्ट सिटीकडून कंपनीवर दंडात्मक कारवाई अपेक्षित होती. प्रत्यक्षात कंपनीने याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. उलट ठेकेदार कंपनीने बांधकाम साहित्याचे दर वाढल्याचे सांगत कंपनीकडेच ६० कोटींची अतिरिक्त मागणी केल्यान आश्चर्य व्यक्त होत आहे. ठेकेदार कंपनीची ही मागणी स्मार्ट सिटीकडे अतिरिक्त रकमेची मागणी बोर्डाने हा प्रस्ताव फेटाळला आहे.
गावठाण पुनर्विकास योजनेतर्गत जुने नाशिक व पंचवटी भागात २०१८ ते २०२३ अशी पाच वर्षे उलटली तरी बी. जी. शिर्के या ठेकेदार कंपनीने दोनवेळ मुदतवाढ घेऊनही कामे पूर्ण केली नाहीत. या कंपनीला दोनवेळा मुदतवाढ देण्याचे औदार्य आता स्मार्ट सिटी कंपनीच्या अंगलट आल्याचे दिसत आहे.
घेतली मुतवाढ
स्मार्ट सिटी कंपनीने बी. जी. शिर्के या ठेकेदार कंपनीस २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश देताना मार्च २०२२ पर्यंत ३० महिन्यांची मुदतवाढ दिली होती. होती. मात्र कोरोनामुळे मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने एप्रिल २०२२ मध्ये सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ घेतली. मात्र या मुदतीमध्येही कामे झाली नसून आता, डिसेंबर २०२३ अखेरची मुदतवाढ देण्यात आली आहे.