एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्रासाठी 'असा' आहे प्लॅन!

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी कृषी, औद्योगिक व पर्यटनाविषयी आराखडा तयार करून तीन महिन्यांत राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकतीच मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची संवाद साधला. प्रत्येक जिल्ह्याचा शाश्वत विकास हा तेथील कृषी, औद्योगिक व पर्यटन या घटकांवर अवलंबून असतो.

त्यामुळे या तिन्ही घटकांवर आधारित प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश बैठकीत दिले. या तिन्ही विभागांच्या माध्यमातील विकासाच्या दृष्टीने सकारात्मक आणि उणिवांचा शोध घ्यायचा आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Mumbai: फडणवीसांच्या प्रयत्नांना यश! अखेर 'तो' आदेश मागे

तसेच भविष्याच्या दृष्टीने या तिन्ही विभागांच्या माध्यमातून विकासासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल तयार करायचा आहे. त्यामुळे भविष्यात नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

जिल्ह्याचा शाश्वत विकास आराखडा तयार करण्यासाठीची जबाबदारी राज्य शासनाने जिल्हा नियोजन विभागावर सोपविण्यात आली आहे. आराखडा बनविण्यासाठी त्रयस्थ कंपनीची मदत प्रशासन घेणार असल्याची माहिती मिळते आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com