Eknath Khadse : कंत्राटदारांना देयके का मिळत नाहीत? एकनाथ खडसेंचा सरकारला सवाल

Eknath Khadse
Eknath KhadseTendernama

नाशिक (Nashik) : राज्य सरकार व्यवस्थित असेल, तर दोन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची देयके कंत्राटदारांना (Contractor) का मिळत नाहीत, कंत्राटदारांना राज्यभर आंदोलन का करावे लागते, राज्यभरात कंत्राटदारांचे ३० हजार कोटींचे देणे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कारभारावर ताशेरे ओढले.

Eknath Khadse
Nashik : अमृत स्टेशन योजनेतून 'या' रेल्वे स्थानकांचा होणार विकास

खडसे म्हणाले, कंत्राटदारांचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नाही. ठेकेदारांनी ११ हजार कोटींची देयके सादर केली असताना सरकारने केवळ ३०० कोटी रुपये निधी वितरित केला आहे. एकीकडे देयके देण्यासाठी निधी नसताना सध्या राज्यात अनेक मोठ्या घोषणा होतात. घोषणा केलेली ती कामे दिसत का नाहीत, याचा शोध घेतला असता, जळगाव जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात जी कामे आधीच झालीत, त्यावर नव्याने बीले काढण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. अर्थसंकल्पातील बराच निधी जिरवण्याचे काम होत आहेत. त्यामुळे निधी खर्च होतो, मात्र कामे दिसत नाहीत,असाही आरोप त्यांनी केला.

Eknath Khadse
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी वाईट बातमी; 'त्या' 38 विहिरी...

खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यातील अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केला. ते म्हणाले, अनेक ठिकाणी कामे न करताच देयके काढून घेतले जात आहेत.
विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे पूर्ण होऊनही देयके देण्यासाठी निधी नसल्याचीबाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी राज्यभरात कंत्राटदार देयकांसाठी करीत असलेल्या उपोषणाचा मुद्दा मांडला.

Eknath Khadse
Pune : पुणेकरांनो 9 ऑगस्टपर्यंत रस्त्यातील खड्डे होणार 'गायब'; 'हे' आहे कारण...

आदिवासींचा निधी वळवला?
आदिवासी विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव असलेला ९ टक्के निधी त्यांच्यासाठीच खर्च होतो का, असा प्रश्न विचारत यावर्षी आदिवासींसाठी राखीव असलेल्या निधीतील १२९३ कोटी रुपये यंदा आपण अन्यत्र वळवले. हे का वळवले? आदिवासींच्या किती समस्या तुम्ही सोडवल्या? त्यावर राज्य सरकार गंभीर होईल की नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com