नितीन गडकरी नाशिकमध्ये कोणती मोठी घोषणा करणार?

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

नाशिक (Nashik) : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या गोंदे ते पिंपरी सदो सहापदरी मार्गासाठी केंद्राने ८६६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या मार्गासह इतरही सुमारे दोन हजार कोटींच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण रविवारी (ता. १८) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Nitin Gadkari
नाशिकमध्ये रिलायन्सच्या फार्मा कंपनीची ४२०० कोटींची गुंतवणूक

मुंबई-आग्रा महामार्गावरील गोंदे फाटा ते पिंपरी सदो येथून जवळच समृद्धी महामार्ग जात आहे.  वाढती रहदारी आणि समृद्धी महामार्गाच्या दृष्टीने या मार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमीपूजन आणि इतर ठिकाणी होणाऱ्या लोकार्पणासाठी ते नाशिकला येणार असल्याची माहिती माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

Nitin Gadkari
स्मार्ट वीज वितरणासाठी नाशिकला दोन हजार कोटींचा आराखडा

नाशिक जिल्ह्यातील गोंदे ते प्रिंपीसदो फाटा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर २० किलोमीटर लांबीच्या ८६६ कोटींचे सहापदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५ या ३७ किलोमीटर लांबीच्या सटाणा ते मंगरूळ खंडाचे रुंदीकरण व दर्जोन्नती करणाच्या ४३९ कोटींच्या कामाचे दहावा मैल जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला राष्ट्रीय महामार्ग ४.३ किमीच्या २११ कोटी रुपयांच्या भुयारी व उड्डाणपूल, खंबाळे ते पहिणे व शतगाव ते अंबोली या ३० किलोमीटर लांबीच्या ३८ कोटींच्या निधीतून मजबूतीकरण केले जाणार आहे. नाशिक - पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यात गुरेवाडी फाटा ते सिन्नर या ९ किलोमीटर मार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामाचे भूमीपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Nitin Gadkari
गडकरींच्या 'या' मोठ्या प्रकल्पाचे टेंडर थेट फ्रान्सच्या कंपनीला

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० अ मार्गावरील ५३.५०० किलोमीटर लांबीच्या मार्गावर ११ कोटींच्या निधीतून रस्ता सुरक्षा सुधार कार्य करण्यात येणार आहे. पिपळगाव-नाशिक-गोंदे या ५१ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ७.५ कोटी किमतीचे एलईडी पथदिवे लावणे या कामांच्या कोनशिलेचे अनावरणही यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नांदगाव ते मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या १ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे रुंदीकरण व दर्जोन्नती करणाच्या २५३ कोटींच्या कामाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गार्डन व्ह्यू महिंद्रा प्रकल्पाजवळ, मुंबई-आग्रा महामार्ग, इगतपुरी येथे करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com