Smart Kumbh Nashik: 12 कोटी भाविकांचे AI करणार व्यवस्थापन; Meta, Google बघा काय करणार?

India’s Most Tech-Enabled Kumbh: Nashik 2027 मध्ये AI-Driven Traffic, Health, Safety आणि बरेच काही
Kumbh Mela, Nashik, AI
Kumbh Mela, Nashik, AITendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा 2027 अधिक सुरक्षित व सुरळीत करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने AI आधारित ‘Kumbh AI Stack’ प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Kumbh Mela, Nashik, AI
तुम्हाला झोप येतेच कशी! अधिकाऱ्यांवर का संतापले राज्याचे मुख्य सचिव?

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 ला तंत्रज्ञानाची मजबूत साथ देण्याच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘Kumbh AI Stack’ प्रणाली विकसित करण्याची योजना आखली असून या माध्यमातून गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

या संदर्भात मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय कार्यशाळेत मुख्य सचिव Rajesh Agrawal, विविध प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी तसेच Meta, Google, Microsoft, MIT Media Lab यांसारख्या जागतिक तंत्रज्ञान संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते. या चर्चेत सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील सर्वात तंत्रज्ञान-सक्षम मेळा बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

Kumbh Mela, Nashik, AI
Kumbh Mela 2027: साधुग्रामचा आराखडा बदलणार, कोट्यवधींचा अपव्यय टळणार; प्राधिकरणाने काय घेतला निर्णय?

‘Kumbh AI Stack’ अंतर्गत हजारो CCTV कॅमेरे, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाईल नेटवर्क डेटा यांचे एकत्रित विश्लेषण करून निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे. नाशिक शहरात सध्या 1300 CCTV कॅमेरे कार्यरत असून त्यात आणखी 4000 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययोजना करणे शक्य होईल.

भाविकांसाठी ‘Kumbhdoot’ नावाचा AI आधारित डिजिटल सहाय्यक विकसित करण्यात येणार आहे. हा सहाय्यक व्हॉट्सॲप, मोबाईल ॲप, IVR आणि सार्वजनिक घोषणांद्वारे मार्गदर्शन करेल. साध्या मोबाईल वापरकर्त्यांनाही ही सुविधा उपलब्ध असेल.

Kumbh Mela, Nashik, AI
सिंहस्थ वर्षभरावर आला; कामे वेळेत पूर्ण होणार का?

या वेळेस व्यवस्थापन ‘Reactive’ पद्धतीऐवजी ‘Predictive’ करण्यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गर्दी, आरोग्यविषयक अडचणी आणि स्वच्छतेचे प्रश्न आधीच ओळखून त्यावर उपाययोजना करता येणार आहेत. ‘Kumbh AI Sandbox’च्या माध्यमातून विविध तांत्रिक उपायांची चाचणी मेळ्यापूर्वीच घेण्यात येणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे 12 कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून एका दिवशी 2.5 कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते. 15 जून ते 30 सप्टेंबर 2027 या कालावधीत हा मेळा पार पडणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन प्रमुख स्थळांदरम्यान 31 किमी अंतर असल्याने तांत्रिक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Kumbh Mela, Nashik, AI
Simhastha Kumbh Mela Nashik: 'ती' कामे सुमार दर्जाची; आमच्या प्रमाणपत्राशिवाय देयके देऊ नका!

महत्त्वाचे...

  • ‘Kumbh AI Stack’ प्रणाली लागू

  • 5000+ CCTV, Drone, Sensor नेटवर्क

  • ‘Kumbhdoot’ AI digital assistant

  • Predictive crowd management

  • 12 कोटी भाविकांची अपेक्षा

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com