Amrut2: गुड न्यूज; मालेगावातील भुयारी गटारींसाठी 500 कोटी मंजूर

Malegaon Municipal Corporation
Malegaon Municipal CorporationTendernama

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत (Amrut Yojana) मालेगाव महानगरपालिकेच्या मलनिस्सारण (टप्पा-२) भूयारी गटार योजनेस राज्य शासनाने बुधवारी (ता. २२) मंजुरी दिली. या योजनेसाठी ४९९ कोटी ६ लक्ष रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी काढला आहे.

Malegaon Municipal Corporation
Mumbai : आता ठाण्यावरून थेट नवी मुंबईत जाणे होणार सोपे, कारण...

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या येथील दौऱ्यात भुयारी गटार योजनेची मागणी केली होती. अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात ९९ कोटी रुपये मंजूर झाले होते. यातील दहा कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी होते.

८८ कोटीमध्ये ६३ एमएलडी एसटीपी प्लॅन्ट व नदी काठावरील भुयारी गटार, मुख्य वाहिनी आदी कामांचा समावेश होता. मात्र, ही योजना व त्यासाठीची रक्कम अपुरी होती. भूयारी गटार योजना संपूर्ण मालेगाव शहरात व्हावी, शहरातील रोगराई, डास, मच्छर व दुर्गंधी कायमची दूर व्हावी यासाठीटप्पा क्रमांक २ च्या प्रकल्पाकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू होता, असे भुसे यांनी सांगितले.

Malegaon Municipal Corporation
Nashik : नाशिक-पुणे रेल्वेसाठीचे भूसंपादन थांबवा; महारेलचे पत्र

पहिल्या टप्प्यातील काम सुमारे ८५ टक्के पूर्ण झाल्याचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी या वेळी सांगितले. या नवीन योजनेमुळे शहरातील मलनिस्सारण व्यवस्थेचे बळकटीकरण होऊन नदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा सुधारून नदीप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, तळवाडे ते मालेगाव ही पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी चार दशकापेक्षा जुनी आहे. यामुळे तळवाडे ते मालेगाव दरम्यान शंभर कोटीची या नवीन जलवाहिनी प्रस्तावित करण्यात आल असून पाणी पुरवठा विभागाने हा प्रस्ताव मंजूरीसाठी अंतीम टप्प्यात आहे, असेही भुसे यांनी सांगितले. दरम्यान या योजनेच्या मंजुरीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव दौऱ्यात दिलेल्या शब्दाची पुर्तता केल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आवर्जुन सांगितले.

Malegaon Municipal Corporation
Nashik : टोल प्लाझाचे टेंडर घेण्यासाठी सात लाखांची लाच घेताना अटक

अमृत योजना (२) भुयारी गटार योजना

प्रकल्प किंमत : ४९९ कोटी ६ लाख

राज्य सरकार हिस्सा : (३३.६७ टक्के) - १८३ कोटी १ लाख

केंद्र सरकार हिस्सा : (३३.३३ टक्के)- १६६ कोटी ३४ लाख

महापालिकेचा हिस्सा : (३० टक्के)- १४९ कोटी ७१ लाख

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com