Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...

Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...

छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) : नवीन शहरातील सिडको (CIDCO) भागातील एन - १ येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. या भागाला पाणीपुरवठा करणारा एन - पाच येथील जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच यासह अनेक भागाची तहान भागविली जात आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ या जलकुंभाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी सिडकोतून होत आहे.

यासंदर्भात प्रतिनिधीने जी.व्ही.पी.आर. कंपनीशी संपर्क साधला असता मजीप्राकडे आम्ही जलकुंभाचा नकाशा सादर केला आहे. वारंवार नकाशा मंजूर करण्याबाबत पत्रव्यवहार करत आहोत. मात्र अधिकारी मंजुरी देत नसल्याने काम रखडल्याचे सांगण्यात आले.

Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...
Good News : जुनी पेंशन लागू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा

औरंगाबाद शहरासाठी अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे महापालिकातर्फे शहर पाणी पुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी ३ सप्टेंबर २०१९ रोजी १६८०.५० कोटी रकमेस तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर सदर प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गत सरकारच्या नगरविकास विभागाने १३ सप्टेंबर २०१९ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर शहर पाणीपुरवठा योजनेची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकण्यात आली.

प्राधिकरणाच्या टेंडर प्रक्रियेत यशस्वी झालेल्या हैद्राबादच्या मे.जी.व्ही.पी.आर. इंजिनिअर्स लि. कंपनीला ४ फेब्रुवारी २०२१ कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. सदर योजना ही कंपनीने ३६ महिन्यात पुर्ण केल्यानंतर पुढील १६ महिने देखभाल दुरूस्तीचा काळ ठरलेला होता. मात्र निम्मा कालावधी उलटून कंपनीने अद्याप २० टक्के देखील काम पूर्ण केले नाही.

याच योजनेअंतर्गत नवीन औरंगाबाद सिडको येथील एन - १ जलकुंभाचे काम हाती घेण्यात आले आहे. २४ लाख लिटर क्षमतेच्या या जलकुंभाहाठी येथील ग्रीनबेल्ट मध्ये जवळपास आठशे मीटरचा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यात केवळ जमीनीचे पहिल्या टप्प्यातील काॅंक्रिटीकरण करून पुढे गत दोन महिन्यांपाहून काम बंद आहे.

Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...
Nashik ZP : 'जलजीवन'च्या 185 योजनांचे घोंगडे अडकले कुठे?

जीव्हीपीआरने  याबाबत संबंधित बांधकाम यंत्रणा पाणीपुरवठा विभाग मजीप्रा यांच्याकडे जलकुंभ बांधकामातील पुढील टप्प्याचा नकाशा मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही मंजुरी न मिळाल्याने काम सुरू होऊ शकलेले नाही, असे टेंडरनामाच्या तपासात समोर आले आहे. सध्या सिडको - हडकोतील अनेक वसाहतींची तहान भागविणार्या एन - ५ जुना जलकुंभ अतिशय जीर्ण झाला असून त्याद्वारेच सिडको हडकोसह अनेक जलकुंभ तसेच ब्रीजवाडी, नारेगाव, मसनतपूर , शहानगर, चिकलठाणा, चौधरी कांलनी, विठ्ठलनगर आदी भागाची तहान भागविली जाते.पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी जलकुंभाचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.

Sambhajinagar : नवीन पाणी पुरवठा योजनेला घरघर; कारण...
Nashik : अडीच वर्षात अठरा ग्रामसेवक, दीड कोटी निधी पडून

'टेंडरनामा'चा सुरूवातीपासून प्रहार

नवीन पाणीपुवठा योजनेच्या मंदावलेल्या गतीबाबत टेंडरनामाने सुरूवातीपासूनच प्रहार केला आहे. पुन्हा सलग दोन दिवस प्रतिनिधीने या पाणी योजनेचा आढावा घेतला. जायकवाडी -  नक्षत्रवाडी मुख्य जलवाहिनी, जलकुंभ बांधनीचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे.

● जायकवाडी धरणात अवकाळी पाऊस आणि पुढे पावसाळा तोंडावर असल्याने इतर कामे शोपीस ठरणार असल्याची शंका विशेष तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कारण धरणात जलसाठ्याची उंची वाढली तर आत काम करणे कसे शक्य होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

● योजनेचे काम सुरू करण्याआधीच जॅकवेलचे काम करणे अपेक्षित होते, असे मानले जात आहे. कारण आडातच नाही, तर पोहोऱ्यात पाणी कसे येणार?

●  जायकवाडी - नक्षत्रवाडी दरम्यान मुख्य जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. टेंडरनुसार प्रतिदिन १५९ मीटर जलवाहिनी टाकण्याचे बंधनकारक असताना ठेकेदार केवळ ९५ मीटर जलवाहिनी अंथरण्याचे काम करत आहे. प्रतिनिधीने प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असता ही माहितीसमोर आली आहे. यात अतिक्रमणाचा अडथळा येत असल्याचे व संबंधित विभागांचे सहकाऱ्य नसल्याचे ठेकेदार कंपनीचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

● शहरातील जलकुंभाची पाहणी केली असता ४९ पैकी अकरा जलकुंभांचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. यातही काही ठिकाणी अद्याप महापालिकेने जागा दिली नाही. काही ठिकाणी जलकुंभ उभारण्यास नागरिकांचा वाद आहे. महापालिका कुठलाही वाद मिटवण्यास फुढाकार घेत नाही. उन्हाळा सुरू असताना मार्चमध्ये अकरा जलकुंभ महापालिकेला हस्तांतर करणार असे ठेकेदाराने न्यायालयात सांगितले होते. पण अकरापैकी चारच जलकुंभ शेवटच्या टोकातील बांधकाम चालू असल्याचे दिसले. यावरून न्यायालयात देखील ठेकेदार तोंडघशी पडणार असल्याचे दिसते.

● शहराअंतर्गत दोन हजार किलोमीटर जलवाहिनीचे पाइप अंथरण्यात येणार आहेत. मात्र अद्याप हे काम देखील संथगतीने सुरू आहे. जायकवाडी धरणातील काॅफर्ड डॅम, नक्षत्रवाडीतील जलशुध्दीकरणा कामाची देखील कासवगती आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com