Chakan Traffic: जीवघेण्या कोंडीतून चाकणकरांची सुटका कधी होणार?

PMRDA : नागरिक, वाहनचालक व उद्योजकांनी आयुक्तांना साकडे
Traffic
Traffic Tendernama

पुणे (Pune) : चाकण -तळेगाव (Chakan - Talegaon), चाकण- शिक्रापूर (Chakan - Shikrapur) मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी (Traffic Jam) होत आहे. ती सोडविण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune - Nashik Highway) चाकण येथे बाह्यवळण मार्ग (Bypass Road) गरजेचा आहे. तो झाला तर चाकणमधील वाहतूक कोंडी ८० टक्क्यांनी कमी होणार आहे. यासाठी PMRDAने तो लवकर करावा, यासाठी चाकणकर नागरिक, वाहनचालक व उद्योजकांनी 'पीएमआरडीए'च्या आयुक्तांना साकडे घातले आहे.

Traffic
Thane Railway Station : रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास; 800 कोटींचे...

चाकण (ता. खेड) येथील बाह्यवळण मार्ग हा गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे. पुणे- नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरुनगर हे काम होणार असे वारंवार सांगितले जाते. २०२३ चा फेब्रुवारी महिना उजाडला तरी मोशी ते चांडोली, राजगुरुनगर या मार्गाचे काम होत नाही. त्यामुळे नागरिक, उद्योजक, कामगार यामध्ये तीव्र असंतोष आहे.

'खासदारसाहेब या मार्गाच्या कामाकडे आता तरी बघा' अशी विनवणी नागरिक तसेच कामगार करत आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यापूर्वी दोन वेळेस येऊन गेले. त्यावेळेस काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुणे- नाशिक महामार्ग,चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत निवेदने दिली आहे. दरम्यान, चाकणचा बाह्यवळण मार्ग ३६ मीटर रुंदीचा तसेच सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा आहे.

Traffic
Budget : भुसावळ-इगतपुरी तिसऱ्या रेल्वेलाइनसाठी 1500 कोटी

वाहतूक कोंडीची ठिकाणे...
१. पुणे -नाशिक महामार्गांवर मोई फाटा,
२. चिंबळी फाटा, कुरुळी फाटा,
३. एमआयडीसी फाटा,
४. आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक

बाह्यवळण मार्गाच्या हद्द निश्चिती होणार...
रासेफाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी या चाकण बाह्यवळण मार्गाच्या हद्द निश्चिती येत्या काही दिवसांत होणार असून त्याबाबतचा अंतिम अहवाल नियोजन मंडळाकडे पाठविला आहे. हद्द निश्चिती करून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाह्यवळण मार्गात जात आहेत. त्या शेतकऱ्यांशी पीएमआरडीएच्या वतीने संपर्क करण्यात येणार आहे, अशी माहिती (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) पीएमआरडीएचे क्षेत्रीय अभियंता जितेंद्र पगार यांनी सांगितले.

Traffic
MSRDC : पुणे-औरंगाबाद, पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडॉरचा प्रश्न सुटणार?

औद्योगिक वसाहतीमुळे तसेच मुंबई, नगर, मराठवाडा, रांजणगाव, पुणे, पिंपरी -चिंचवड, नाशिक या परिसरातील कंपन्यात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची चाकण परिसरातील मार्गाने ये -जा असते. पुणे नाशिक महामार्ग, तळेगाव, चाकण, शिक्रापूर या मार्गावर दररोज सुमारे पाच हजारावर अवजड वाहने यामध्ये कंटेनर, ट्रक, टेलर आदी ये-जा करतात. यामुळे या मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे.
- ज्ञानेश्वर झोल, पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com