उजनीच्या पर्यटन विकासासाठी सरकारने काय घेतला निर्णय?

आराखड्यासाठी यंदा 100 कोटी; मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने लवकरच कामाला सुरुवात, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची माहिती
Ujani Dam
Ujani DamTendernama
Published on

मुंबई (Mumbai): सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाबाबत उद्भवलेल्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिली.

Ujani Dam
Nashik: सप्तशृंगगडावरील 81 कोटींच्या कामांकडे दुर्लक्ष; अवघा 68 लाखांचा निधी

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, दि. ३० सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पासाठी २८५.७५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रकल्पांतर्गत जल पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटन अशा चार घटकांचा समावेश आहे.

Ujani Dam
Maharashtra Tourism: विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! काय आहे प्लॅन?

चार घटकांपैकी कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाच्या कामांना कोणतीही अडचण नसून जल पर्यटनाच्या बाबतीत जलसंपदा विभागाच्या स्वतंत्र धोरणामुळे काही प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता आहे. उजनी धरणाची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्याने त्या विभागाची ना हरकत आवश्यक ठरते. त्यामुळे पर्यटन विभाग व जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय साधून काही प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत तर काही पर्यटन विभागामार्फत राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही जयस्वाल यांनी सांगितले.

Ujani Dam
Good News! मुंबईच्या पर्यटनाला मिळणार जागतिक झळाळी

आमदार अभिजित पाटील यांनी उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी २८२.७५ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नसल्याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com