Mumbai-Pune wayवर कारवाई थांबली अन् पुन्हा बेशिस्त वाहनचालकांची...

Mumbai Pune Express
Mumbai Pune ExpressTendernama

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग व जुना पुणे-मुंबई महामार्गवर परिवहन विभागाची गेल्या सहा महिन्यांपासून २४ तास सुरु असलेली कारवाई थांबली आहे. परिवहन विभागाला अपघातासंदर्भात आवश्यक असलेली माहिती मिळाली असल्याने २४ तास चालणारी कारवाई थांबविण्यात आली आहे. मात्र, यामुळे आता दोन्ही मार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

Mumbai Pune Express
Exclusive: 'मलिद्या'ची हाव, सावेंचा PS तब्बल 9 महिने बनला साव?

अपघात कमी करण्यासाठी व अपघातांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक डिसेंबर २०२२ पासून चोवीस तास बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरु केली होती. यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड आरटीओची १२ पथके चोवीस तास तैनात करण्यात आली. या सहा महिन्यांत सुमारे पन्नास हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई केली. सर्वांत जास्त कारवाई वेगाने वाहन चालविणे, लेन कटिंग करणे आदी प्रकारच्या गुन्ह्यासंबधी वाहन चालकांवर कारवाई झाली आहे. ही कारवाई एक जून रोजी संपली. या कारवाईमुळे अपघाताचे प्रमाण मात्र सुमारे ३३ टक्क्यांनी घटले होते.

Mumbai Pune Express
Pune: राज्य परिवहनच्या पुणे विभागाने का मागविल्या अतिरिक्त गाड्या?

कारवाई थांबल्यावर...

गेल्या काही दिवसांत परिवहन विभागाने कारवाई थांबविल्यावर वाहन चालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. जड वाहन चालकांकडून लेन कटिंग, भरधाव वाहने चालविणे असे प्रकार पुन्हा वाढू लागले आहेत. अपघाताचे प्रकार देखील पुन्हा वाढू लागले आहे. खंडाळा गावाच्या हद्दीत मंगळवारी रयासन घेऊन जाणारा टँकरचा अपघात झाला. यात चार जणांचा मृत्यू झाला. वाहन चालकांवर वचक राहण्यासाठी परिवहन विभागाने पूर्वी प्रमाणे चोवीस तास कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.

सहा महिन्यांचासाठीच २४ तास कारवाई करण्याचे नियोजन होते. यात आम्हाला अपघाताचे प्रमाण व कारणे या दोन्हींचा अभ्यास झाला. अपघात कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळविले आहे.

- भरत कळसकर, परिवहन उपायुक्त, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com