Pune : पालिकेच्या 'त्या' कामांना वाहतूक पोलिसांकडून ग्रीन सिग्नल

Pune City
Pune CityTendernama
Published on

पुणे (Pune) : पावसाळ्यापूर्वी शहरातील पूरस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला (PMC) काम करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ६१ ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे ३१ मेपूर्वी यातील बहुतांश कामे पूर्ण होतील, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

Pune City
Devendra Fadnavis : दिल्ली-मुंबई कॉरीडॉरसाठी आणखी 8 हजार एकर भूसंपादन

पुणे महापालिका, वाहतूक पोलिसांनी शहरात पाणी साठणाऱ्या २०१ ठिकाणांची यादी तयार केली आहे. त्या ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी पावसाळी गटारे टाकणे, उतार करणे, चेंबर टाकणे यांसह अन्य कामे केली जाणार आहेत.

तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे (एनडीएमए) महापालिकेला निधी देण्यात आला आहे. त्यातूनही आपत्ती निवारणाची कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८३ कामांसाठी टेंडर काढण्यात आल्या असून, त्यापैकी २१ ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.

Pune City
Mumbai : 'त्या' 3 प्रमुख मार्गांवर लोकलच्या स्वतंत्र मार्गिका; 14 हजार कोटींचे बजेट

उर्वरित ठिकाणे शहरातील वर्दळीचे रस्ते आणि चौकात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने अशा ६२ कामांसाठी वाहतूक पोलिसांकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. त्यापैकी ६१ ठिकाणच्या कामांना मान्यता दिली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही कामे रात्री करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

महत्त्वाचे
- पुणे शहरात पाणी साचणाऱ्या २०१ ठिकाणांपैकी २१ ठिकाणी पावसाळी गटारे टाकणार
- चेंबर तयार करणार
- तरीही या ठिकाणी पाणी साचल्यास पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र पथके तैनात केली जाणार
- या पथकांकडे पंप, जनरेटर आदी साहित्य असणार

Tendernama
www.tendernama.com