पुणेकरांनो महावितरणला पर्याय आला; गुजराथी कंपनी वीज पुरवठ्यास सज्ज

Electricity
ElectricityTendernama

पुणे (Pune) : महावितरणच्या (Mahavitran) भांडूप परिमंडळापाठोपाठ आता पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका परिसरात समांतर वीज पुरवठ्यासाठी गुजरात येथील टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीने (टीपीएल) महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. आयोगाने हा अर्ज दाखल करून घेत नागरिकांकडून हरकती-सूचना मागविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आयोगाने मान्यता दिल्यास पुणे परिसरात महावितरणबरोबरच खासगी कंपनी वीजपुरवठा करू शकणार आहे.

Electricity
मुंबई महापालिकेचे 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' पुरवठ्यासाठी टेंडर

भांडूप परिमंडळात समांतर वीज पुरवठ्यासाठी परवानगी मागणारा अर्ज अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने केला आहे. त्यावरून महावितरणसह तीनही कंपन्यांतील अधिकारी, कर्मचारी आणि इंजिनिअर्सनी त्यास विरोध करीत ७२ तासाचा बंद पुकारला होता. या कालावधीत महावितरणने पर्यायी व्यवस्था केली असल्याचा दावा केला होता. तरी देखील पुणे परिसराला या बंदचा मोठा फटका बसला होता. आता पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात समांतर वीज पुरवठ्यासाठी टोरेंट पॉवर लिमिटेडने आयोगाकडे परवानगी अर्ज केला होता. यावर नागरीकांना ३० दिवसांत कुलाबा येथील महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे, तसेच suggestion.torrentpune@merc.gov.in या ई-मेलवर हरकती पाठविता येणार आहेत.

Electricity
लक्ष आहे आमचं! मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर नियम मोडणारांना दणका

टोरेंट कंपनीविषयी...
टोरेंट ही भारतातील आघाडीच्या वीज कंपन्यांपैकी एक आहे. वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण अशा तीनही क्षेत्रात ही कंपनी काम करते. सध्या अहमदाबाद, गांधीनगर, सुरत आणि दहेज भागातही वीज पुरवठा करते. तर महाराष्ट्रातील भिवंडी आणि शीळ, मुंब्रा व कळवा भागात तसेच उतर प्रदेशमध्ये आग्रा येथे कंपनीकडे फ्रँचायझी आहे. दमण व दीव, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे वीज वितरणाचे काम या कंपनीला दिले आहे. सध्या ४० लाख वीज ग्राहकांना ही कंपनी वीज पुरवठा करते. दमण व दीव, दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात १० अब्ज युनिट वीज विक्री करीत आहे. आयोगाने या कंपनीला मान्यता दिल्यास परवाना मिळाल्यापासून पुढील पाच वर्षांत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सहा लाख ग्राहकांना वीज पुरवठ्याचे उदिष्ट या कंपनीने ठेवले आहे.

१२०० ते १५०० मेगावॉट
- पुणे शहराची दररोजची वीज गरज

३२ लाख (सर्व वर्गवारीतील ग्राहक)
- पुणे व पिंपरी परिसरातील वीज ग्राहक

२५ ते २७ लाख
- ‘टोरेंट’चे समांतर वीज ग्राहकांची संख्या


७५० ते ८०० कोटी (दरमहा)
- पुणे, पिंपरीतून महावितरणचा महसूल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com