...अशी असेल PCMC मुख्यालयाची 13 मजली नवी इमारत! टेंडर निघाले

PCMC
PCMCTendernama

पिंपरी (Pimpri-Chinchwad) : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक १३ मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३१२ कोटी २० लाख ३२ हजार ८३८ रुपये खर्च अपेक्षित असून, त्याबाबतचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे.

PCMC
पुणे महापालिकेने नेमले 7 नवे ठेकेदार; वर्षाला अडीच कोटींचे उत्पन्न

महापालिकेची विद्यमान चार मजली इमारत मुंबई-पुणे महामार्गावर मोरवाडी चौक ते पिंपरी चौक दरम्यान आहे. तिचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते १३ मार्च १९८७ रोजी झाले होते. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची दालने आहे. तिसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर, पक्षनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते, स्थायी समिती सभागृह व नगरसचिवांचे दालन आहे. चौथ्या मजल्यावर आयुक्तांसह दोन अतिरिक्त आयुक्त व प्रशासन विभागाची दालने आहेत. सध्या कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक विभागांची कार्यालये मुख्यालयातून महापालिकेच्या इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. महापालिकेच्या तळ मजल्यावरील वाहनतळही पुरेसा नाही. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशन परिसरातील महापालिकेच्या ३५ एकर भूखंडापैकी सात एकर जागेत १३ मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. पुढील ५० वर्षांचे नियोजन करून इमारतीचा आराखडा तयार आहे. बांधकाम परवानगी घेणे, स्ट्रक्चरल डिझाइन, सखोल अंदाजपत्रक टेंडरसंदर्भात आणि टेंडरपश्चात कामे करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली आहे.

PCMC
म्हाडा कोकण, पुणे विभागाची बंपर गृह योजना; तब्बल 'इतक्या' हजार...

गांधीनगरचा प्रस्ताव बारगळला

सध्याच्या इमारतीच्या मागील बाजूस गांधीनगर-पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या जागेत इमारत बांधण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठीच्या खर्चास महापालिका सर्वसाधारण सभेने दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली होती. टेंडर प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तत्कालीन सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरसुद्धा आग्रही होते. वास्तुविशारद ‘लॅण्डमार्क डिझाइन ग्रुप’ने १७ डिसेंबर २०१९ रोजी इमारतीचा विविध पर्यायांतील आराखड्याचे सादरीकरण केले होते. २४ हजार ५४४ चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर नऊ मजली इमारतीचा आराखडा होता. साडेचार एकर जागेमध्ये इमारतीचे बांधकाम करण्याकामी अगोदर २९९ कोटी खर्च अपेक्षित धरला होता. २४६ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्यानंतर ते रद्द करण्यात आले.

PCMC
Pune: महावितरण ग्राहकांना देणार तब्बल 114 कोटींचा परतावा...

अशी असेल पर्यावरणपूरक इमारत

- विविध विभाग, महापौर, पदाधिकाऱ्यांची दालने व स्थायी समिती सभागृह

- ३०० आसन क्षमतेचे सर्वसाधारण सभागृह, उपहारगृह, स्वच्छतागृह

- पाचमजली स्वतंत्र वाहनतळ, ५०० चारचाकी व दीड हजार दुचाकी क्षमता

- गच्चीवर हेलिपॅड असेल, ४०० कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित खर्च

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com