ST : मे अखेरीस पुणे-मुंबई मार्गावर धावणार 'एवढ्या' ई-शिवनेरी

Shivneri
ShivneriTendernama

पुणे (Pune) : पुणे-ठाणे (Pune-Thane) मार्गावर सध्या दिवसभरातून सात ई-शिवनेरी धावत आहेत. प्रवाशांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुंबईतदेखील चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरू आहे. ते काम काही दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस पुणे-मुंबई मार्गावर किमान ५० ई-शिवनेरी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

Shivneri
Pune : 'या' दोन नवीन पुलांमुळे शहरातील वाहतूक होणार सुरळीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे-पुणे ई-शिवनेरी बसचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर दोन दिवसांतच बसची संख्या वाढविण्यात आली. बुधवारी ७ बस या मार्गावर सोडण्यात आल्या. सर्वच बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बस कंपनीकडून ज्या प्रमाणात बस उपलब्ध होतील, तशा त्या लागलीच प्रवाशांच्या सेवेत रुजू केल्या जाणार आहे.

Shivneri
Nashik: सिंहस्थमेळा; साधुग्रामसाठी 300 एकर भूसंपादनाचा अहवाल पाठवा

तोट्यात धावणारी शिवनेरी आता नफ्यात

पुणे-मुंबई मार्गावर डिझेलवर धावणाऱ्या शिवनेरीचा वाहतुकीचा खर्च अधिक होता. त्यामुळे या मार्गावरच्या शिवनेरीचा उत्पन्न कमी अन् खर्च अधिक अशी स्थिती होती. आता मात्र ई-शिवनेरीमुळे परिस्थिती बदलली आहे. यामुळे वाहतुकीचा खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे काही दिवस आधी तोट्यात धावणारी ई-शिवनेरी आता पाच ते सहा प्रति किलोमीटर नफ्यात आली आहे.

Shivneri
Navi Mumbai : 30 हजार घरे विक्रीविना पडून कारण...

‘कॅपिटल कॉस्ट’मुळे तिकीट दर जैसे थे

ई-शिवनेरीच्या वाहतुकीचा खर्च कमी झाला असला तरीही कंपनीच्या बस खरेदीच्या कॅपिटल कॉस्टचा विचार करता या मार्गावर धावणारी डिझेलवरील ई-शिवनेरी बंद होणार नाही. तोपर्यंत ई-शिवनेरीचे तिकीट दर कमी होण्याची शक्यता नाही. आता डिझेल व ई-शिवनेरीचे प्रति प्रवासी तिकीट ५१५ रुपये आहे.

बस कंपनीकडून जशा बस उपलब्ध होतील, तशा त्या मार्गावर सोडण्यात येतील. मे अखेरीस ५० ई-शिवनेरी पुणे-मुंबई मार्गावर धावतील. एकूण १०० बसचे नियोजन आम्ही केले आहे.

- शिवाजी जगताप, सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com