फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार; पुणे जिल्ह्यात 221 मेगावॅट सौर वीजनिर्मिती

CM Solar
CM SolarTendernama

बारामती (Baramati) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात २२१ मेगावॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील ४१ उपकेंद्रांतर्गत सरकारी गायरान जमिनीवर हा प्रकल्प होणार आहे.

CM Solar
CM शिंदेंची कुर्ल्याच्या SRA वसाहतीला सरप्राईज व्हिजीट; अधिकारी, ठेकेदाराला घेतले फैलावर

बारामती मंडलातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर व शिरूर या ५ तालुक्यातील १३८ गावांमधील ६७ हजार शेतीपंप ग्राहकांना याचा फायदा होणार असून, त्यांना दिवसा वीज मिळणार असल्याची माहिती महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिली. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० युद्धपातळीवर राबविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी ‘एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लि..’ही कंपनी स्थापन केली आहे. पहिल्या टप्प्यांत सरकारी पडीक गायरान जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी सोलार कंपनीने अकोला, बुलडाणा, वाशीम, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना, जळगाव व नांदेड या ९ जिल्ह्यांचे टेंडर नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

CM Solar
Pune : रिंगरोडसाठी 14 गावांतील सुमारे 200 एकरहून अधिक जागा ताब्यात

पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यांत २२१ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होईल. त्याकरिता जवळपास १०९१ एकर जागेची आवश्यकता असून या जमिनी १ रुपया वार्षिक भाडेपोटी ३० वर्षांच्या करारावर शासनाकडून मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे ही शासनाची भूमिका असल्याने गायरान जमिनी हस्तांतरण करणेकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावितरणला साथ दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही जमीन हस्तांतरणास मदत केल्याचे सुनील पावडे यांनी सांगितले. ४१ पैकी २३ उपकेंद्र बारामती अंतर्गत तर उर्वरित पुणे परिमंडलात येतात. १० उपकेंद्रांना त्यांच्या संपूर्ण क्षमते इतक्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये बारामती मंडलात लोणी देवकर व बाभूळगाव उपकेंद्रांतर्गत अनुक्रमे २०.१६ व ९.३८ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, त्याकरिता अनुक्रमे १०० व ४५ एकर जमीन करारावर उपलब्ध झाली आहे. तर उर्वरित २१ उपकेंद्रांना ४४० एकर अशी मिळून तब्बल ५८६ एकर जमीन महावितरणला मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com