Sinhagad Road : सिंहगड रस्त्यावरून सकाळी अन् संध्याकाळी प्रवास करूच नका! कारण काय?

Pune : विठ्ठलवाडी ते जयदेवनगर असे दांडेकर पुलाकडेच्या दिशेला असणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून तो पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
Sinhagad Road Flyover
Sinhagad Road FlyoverTendernama
Published on

सिंहगड रस्ता (Sinhgad Road) : सिंहगड रस्त्याला उड्डाण पुलाचे (Sinhagad Road Flyover) काम सुरू आहे. या कामामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी (Traffic) होत असते. त्यामुळे उड्डाणपुलाची कामे गर्दीच्या वेळेत न करता अन्य वेळेत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Sinhagad Road Flyover
Pune : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोंडी टाळण्यासाठी...

विठ्ठलवाडी ते जयदेवनगर असे दांडेकर पुलाकडेच्या दिशेला असणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून तो पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्याचे उद्‍घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते, परंतु विठ्ठलवाडीहून माणिकबागकडे जाणाऱ्या पुलाचे काम अद्याप बाकी आहे. ते काम पूर्ण झाले नाही.

आधीच हा रस्ता अरुंद आहे, त्यातच सकाळी गर्दीच्या वेळेत पुलाच्या कामासाठी लागणारी मशिनरी किंवा इतर अवजड वाहने रस्त्यावर उभी असतात, त्यामुळे येथील कोंडीत भर पडते. तसेच कालव्याचा पर्यायी रस्ता आणि महामार्गाला लागून असणारे रस्ते या ठिकाणी काही कारणामुळे वाहतूक बंद झाल्यास मुख्य सिंहगड रस्त्यावर अधिक ताण येतो.

Sinhagad Road Flyover
Nashik : सिन्नर MIDC होणार नाशिकमधील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत; एकरी 52 लाखांचा दर

सकाळी साडेआठ ते अकरा या वेळात सुरू असणारी पुलाची कामे रात्रीच्या वेळी अथवा दुपारच्या वेळी केली, तर काही प्रमाणात कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. सकाळी कामानिमित्त कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांनाही यामुळे दिलासा मिळेल.

तसेच या कोंडीमुळे होणारे किरकोळ अपघातही टळतील, म्हणून गर्दीच्या वेळा टाळून पुलाची कामे करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Sinhagad Road Flyover
नाशिक : ६८२ अंगणवाड्यांना मिळेनात इमारती; कोण आहे जबाबदार?

सकाळी गर्दीच्या वेळेस उड्डाण पुलाची कामे सुरू असतात. त्यामुळे दररोज कोंडी होते. घरातून कितीही लवकर निघाले, तरी कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होतो. सायंकाळीही घरी परतत असताना वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. त्यामुळे बहुतांश वेळ कोंडीत गेल्याने वेळेचे नियोजन करण्यासाठी तारेवरची कसरत होते.

- शीतल शिंदे, रहिवासी, सिंहगड रस्ता

या उड्डाण पुलाचे काम सुरू करण्याआधी प्रशासनाने पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यायला हवे होते. ते पूर्णपणे दिले गेले नाही. गरजेच्या वेळी वॉर्डन अथवा वाहतूक पोलिस असतात, परंतु नागरिकांकडून त्यांच्या सूचनांचे पालन केले जात नाही. सोबतच वाहतूक नियमांचेही पालन होत नाही. त्यामुळे कोंडीत भर पडते.

- योगिता दुधाणे, स्थानिक नागरिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com