धक्कादायक! Pune - Solapur रस्त्यावर 'हा' आहे Accident Zone

Accident Zone
Accident ZoneTendernama

पुणे (Pune) : पुणे-सोलापूर रस्त्यावर (Pune - Solapur Road) हडपसर (Hadapsar) व लोणी काळभोर (Loni Kalbhor) हा भाग अपघातप्रवण क्षेत्र (Accident Zon) असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. पुणे आरटीओने (Pune RTO) रस्ता सुरक्षेसाठी हे सर्वेक्षण केले. या संदर्भात तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचे आढळून आले.

Accident Zone
Nagpur : उपराजधानीतील 'या' उड्डाणपुलाची 7 वर्षांपासून रखडपट्टी

रस्ता सुरक्षेसंदर्भात रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे-नगर व पुणे-सोलापूर या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याची सूचना आरटीओला दिली होती. अपघातांची करणे शोधून उपाययोजना सुचवाव्यात असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नगर रस्त्याचे सर्वेक्षण यापूर्वीच करण्यात आले. त्याचा अहवालही देण्यात आला.

त्यानंतर आरटीओचे चार मोटार वाहन निरीक्षकांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महापालिका आदी विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोलापूर रस्त्याचे सर्वेक्षण केले.

Accident Zone
Sambhajinagar : सिडको वासियांना ग्रासले खड्डे अन् दूषित पाण्याने

काय आढळले सर्वेक्षणात

- रस्त्यावर अनेक ठिकाणी अवैध पार्किंग

- पदपथ तसेच अन्य भागांत अतिक्रमण

- बऱ्याच ठिकाणी तोडलेले दुभाजक

- दुभाजक तोडून वाहनांची अवैधपणे वाहतूक

- आवश्यक त्या ठिकाणी सायनेज बोर्ड नाहीत

काय आहेत उपाययोजना

- चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग टाकणे

- रस्त्यावर रम्बलर्स टाकणे

- अतिक्रमण हटविणे

- वाहन चालकांसाठी सूचनांचे फलक लावणे

- थेऊरजवळ उड्डाणपूल बांधणे

Accident Zone
Nashik : मालमत्ता कर बुडवल्याने 'समृद्धी'च्या ठेकेदाराला ग्रामपंचायतीची नोटीस

पुणे-नगर रस्त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सोलापूर रस्त्याचे सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. सुरक्षित रस्ते प्रवासासाठी कोणत्या विभागाने कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे हे सुद्धा अहवालात नमूद केले जाईल.

- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com