शिंदे-फडणवीस साहेब, 'महसूल'मधील रिक्त 10 हजार जागा कधी भरणार?

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama

पुणे (Pune) : सरळसेवा भरती रखडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे. राज्य सरकारने सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत म्हणून उमेदवार आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागातील (Revenue Department) तब्बल ३१ टक्के जागा रिक्त असल्याची माहिती आता समोर आली आहे. विविध पदांच्या ३३ हजार ४३४ जागांपैकी १० हजार ४४८ जागा रिक्त असून, यातील सर्वाधिक जागा या ‘क’ संवर्गातील आहे. माहिती अधिकाराअंतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल विभागाच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Thane महापालिकेचा ठेकेदारांना दणका; नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी...

पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे राजेश जाधव (नाव बदलले) याने सांगितले की, ‘‘महसूल व वन विभागामध्ये वर्ग अ आणि ब बरोबरच क संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहे. यामध्ये तब्बल ५००० हून अधिक जागा या तलाठ्यांच्या आहेत. मात्र, शासन त्यांच्या भरतीसाठी कोणतीच हालचाल करताना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या घोषणेला निदान शासनाने जागावे.’’ रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील यंत्रणांना अधिक ताण सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही विविध सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Eknath Shinde
CM: कोल्हापुरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

तलाठी भरती ‘टीसीएस’मार्फत
माहिती अधिकाराला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएस मार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे. याद्वारे चार हजार ६८१ जागा भरण्यात येणार आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया केव्हा पार पडेल याबद्दल स्पष्टता नाही.

महसूल विभागातील महत्त्वाच्या पदांचे विवरण...
संवर्ग ः मंजूर पदसंख्या ः रिक्त पदे
उपजिल्हाधिकारी ः ३०० ः ५६
तहसीलदार ः २०९ ः ८५
अराजपत्रित लघुलेखक ः १६६ ः ९२
मंडळ अधिकारी ः ५७०९ ः ९५४
नायब तहसीलदार ः ६३७ ः २८१
तलाठी ः १५७४४ ः ५०३०

गटानुसार रिक्त पदांचे विवरण (पदोन्नतीसह)
गट ः मंजूर पदसंख्या ः रिक्त पदे
अ ः १५७७ ः १४०
ब ः ३४०१ ः ८८३
क ः ३९४७४ ः ९९५६
ड ः ७७९१ ः २३७५
एकूण ः ५२२४३ ः १३३५४
(३१ नोव्हेंबर २०२२ पर्यंतची आकडेवारी)

Eknath Shinde
जलवाहिनीच्या कामातील गौणखनिज विकून कोट्यवधींची रॉयल्टी बुडवली

महसूल विभागातील ३० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असणे निश्चितच गावगाड्यासाठी योग्य नाही. त्याचबरोबर गेली कित्येक वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना एक प्रकारचा हा अन्यायच आहे. सरकारने कोणताही विलंब न करता तातडीने पदभरती करावी. अन्यथा पुढील महिन्यात यासंबंधी आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com