मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी PMC, PCMCचे स्वतंत्र टेंडर

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी PMC, PCMCचे स्वतंत्र टेंडर

पुणे (Pune) : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PMC - PCMC) वतीने संयुक्तरित्या मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये पुणे महापालिका ७५० कोटी रुपयांचे टेंडर काढणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिका फक्त खर्च अदा करेल असे ठरले होते. मात्र, या निर्णयात मोठा फेरफार करत दोन्ही महापालिकांनी स्वतंत्र टेंडर कार्यवाही सुरू केली आहे. पिंपरी महापालिकेने तब्बल ३२० कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे.

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी PMC, PCMCचे स्वतंत्र टेंडर
गडकरींकडून झाडाझडती; अखेर 'त्या' महामार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त

शहरातील मुळा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुणे व पिंपरी महापालिकेने संयुक्तरित्या आराखडा तयार केला आहे. शहरांमधून १४ कि.मी. मुळा नदी वाहते. पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुळा नदीचा जास्त भाग येतो. त्यामुळे पुणे महापालिकेने संयुक्तरित्या पूर्ण नदीकाठी सुधारणा योजना राबवणे प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत पुणे महापालिकेने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली आहे. त्यासाठी संयुक्त टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार होती.

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी PMC, PCMCचे स्वतंत्र टेंडर
पुणे रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! उद्यापासून..

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी टेंडरपूर्व आणि टेंडर पश्चात कामासाठी संयुक्त टेंडर समितीही स्थापन केली होती. मात्र, पिंपरी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने यावर ‘यू टर्न’ घेतला आहे. एकत्र टेंडर न काढता पर्यावरण विभागाने स्वतंत्र ३२० कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केली आहे. या कामाचे संयुक्त टेंडर ६०० कोटी रुपयांचे काढण्यात येणार होते. मात्र, दोन्ही महापालिकांनी स्वतंत्र टेंडर काढल्या आहेत. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये मुळा नदीचा कमी भाग असतानाही प्रशासनाने ३२० कोटी रुपयांची, तर पुणे महापालिकेने ३०१ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे.

मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी PMC, PCMCचे स्वतंत्र टेंडर
शिंदे साहेब इकडे लक्ष द्या! भंगार गाड्यांतून जीवघेणा प्रवास थांबवा

पुणे महापालिकेने ‘क्रेडिट नोट’ या पद्धतीने टेंडर काढले आहे. म्हणजेच ते रोख पैसे ठेकेदाराला देणार नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे ‘क्रेडिट नोट’ पद्धत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका काम करून घेते आणि रोख पैसे देते या पद्धतीने टेंडर काढले जाते. त्यामुळे दोन्ही महापालिका स्वतंत्र टेंडर काढून काम करणार आहेत.

- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com