Good News : बारामती-फलटण रेल्वेमार्ग अखेर प्रत्यक्षात उतरण्याचा पहिला टप्प्यास प्रारंभ

Railway
RailwayTendernama
Published on

बारामती (Baramati) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला बारामती-फलटण रेल्वेमार्ग अखेर प्रत्यक्षात उतरण्याचा पहिला टप्प्यास प्रारंभ झाला आहे. या रेल्वेमार्गाच्या मुरुमीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून वेगाने सुरू झाले आहे.

Railway
Pune : पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यात अडचणीची शक्यता; काय आहे कारण...

बारामती बाजूकडून तांदुळवाडी व सावंतवाडी भागात तर फलटण बाजूकडून कुरणेवाडीनजिक मुरूम टाकून रेल्वे रूळ टाकण्यासाठीचा भराव तयार करण्याचे हे काम सुरू झाले आहे. बारामती फलटण लोणंद या रेल्वेमार्गाला रेल्वे विभागाने सन १९९७-१९९८ च्या रेल्वे अर्थसंकल्पातच मंजुरी दिली होती. प्रत्यक्षात या रेल्वे मार्गासाठीचे भूसंपादन सुरू व्हायला २६ वर्षांचा काळ निघून गेला. फलटण लोणंद हे भूसंपादन होऊन तेथे रेल्वे मार्गही अस्तित्वात आला. बारामती फलटण हे भूसंपादन रखडले होते. आता मात्र भूसंपादन संपलेले आहे. गेल्या २६ वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता सुरू झाल्याने रेल्वेच्या नकाशावर लवकरच बारामती हे एक महत्त्वाचे स्थानक म्हणून उदयास येणार आहे. बारामती फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे सर्व काम पूर्णत्वास गेलेले असून, ही जमीन रेल्वेच्या ताब्यात देण्यात आली असून रेल्वेकडून मुरुमीकरणाच्या टेंडर काढून प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ झाला आहे.

Railway
Pune : जागेची मालकी नक्की कोणाची? काय दिला कोर्टाने निर्णय?

एक वर्षात मुरुमीकरणाचे व त्या नंतर प्रत्यक्ष स्थानक उभारणी व रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम संपविण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल अशी माहिती सूत्रांनी दिली.

दृष्टीक्षेपात रेल्वे मार्ग असा असेल....

* बारामती फलटण हा ३७ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग असेल.

* यात चार मोठे पूल, २६ मेजर पूल, २३ मायनर पूल व ७ आरओबी असतील.

* नीरा व क-हा नदी, नीरा डावा कालव्यावर पूल उभारले जातील.

* न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे अशी तीन रेल्वे स्थानके या मार्गावर नव्याने उभारली जातील.

* पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वेमार्ग टाकला जाईल

* हा रेल्वे मार्ग विद्युतीकरणासह सुरू होईल.

* दोन वर्षात काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असेल.

* दोन टप्प्यात ६०० कोटी रुपये यावर खर्च केले जातील.

वेळ व अंतर यांची होईल बचत...

सध्या बंगळूरमार्गावर जाण्यासाठी पुणे ते लोणंद व दौंड ते पुणे असे तब्बल १६६ किलोमीटर अंतर पार करावे लागते. बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्ग झाल्यानंतर हेच अंतर १०४ कि.मी. इतके कमी होईल. याचाच अर्थ ६२ किलोमीटर अंतर कमी होऊन वेळ, इंधन यांची बचत होईल. इंजिनची दिशा बदलण्याची गरज भासणार नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com