Railway: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने दिली गुड न्यूज

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेस मिळणार गती
Indian Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai): पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Indian Railway
गोपिनाथ मुंडेंचे स्वप्न प्रत्यक्षात! बीड ते अहिल्यानगर मार्गावर धावणार पहिली रेल्वे

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०:५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्रसरकार व राज्यशासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा २ हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

Indian Railway
Nagpur: नागपुरातील 'त्या' उड्डाणपुलाची गिनिज बुकात नोंद; कारण काय?

राज्य शासनाच्या हिस्स्यातील या २ हजार ५५० कोटींपैकी पुणे महानगरपालिका (२० टक्के) ५१० कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (२० टक्के ) ५१० कोटी, पीएमआरडीए (३० टक्के) ७६५ कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे.

या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com