कात्रजकरांच्या नशिबी कोंडीच; वंडर सिटी ते राजस उड्डाणपुलाला 2025 पर्यंत मुदतवाढ

Katraj Chowk Flyover
Katraj Chowk FlyoverTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंत सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये पुणे महापालिकेला वर्ग केले असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.

Katraj Chowk Flyover
‘त्या’ 300 एकरावरील ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’चा मार्ग मोकळा; न्यूयॉर्क, लंडनच्या धर्तीवर...

याबाबत सदस्य रवींद्र धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नितीन राऊत यांनीही उपप्रश्न उपस्थित केला. मंत्री चव्हाण म्हणाले की, आजपर्यंत या उड्डाण पुलाचे ४० टक्के काम पूर्ण झालेले आहे. तसेच स्लीप रोडचे काम पूर्ण झालेले असून सेवा रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. या पुलाच्या बांधकामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सन २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सन २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.

Katraj Chowk Flyover
Mumbai Goa Highway News : यंदाच्या गणेशोत्सवातही मुंबई-गोवा महामार्गाची रडकथा कायम; आता डिसेंबरचा मुहूर्त

या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूर्ण वेळ ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिकेला निर्देश देण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com