पुणेकरांची पेठांकडे पाठ; पण उपनगरे का खाताहेत भाव? वाचा सविस्तर...

Pune City
Pune CityTendernama

पुणे (Pune) : गेल्या वर्षभरात पेठांच्या परिसरात सदनिकांच्या खरेदी-विक्रीत रेडी-रेकनरमधील (वार्षिक बाजारमूल्य दर) दरांपेक्षा १० ते १६ टक्के कमी दराने व्यवहार होत आहेत. या उलट उपनगरांमध्ये रेडी-रेकनरमधील सदनिकांच्या दरापेक्षा १० ते १५ टक्के जादा दराने व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले. तर पुणे शहरातही रेडी-रेकरनमधील दरांपेक्षा जादा दराने खरेदी-विक्री होत आहे. शिवाय पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रेडी-रेकनरमधील दरांपेक्षा जादा दराने सदनिकांची विक्री होण्याचे प्रमाण जास्त आहे.

Pune City
नाशिक जिल्हा परिषद उभारणार १०० आदर्श शाळा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ साठी रेडी-रेकनरचे नवे दर निश्‍चित करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान खरेदी-विक्री व्यवहारांच्या अभ्यास नोंदणी विभागाने केली. त्यासाठी ‘एनआयसी’कडून व्यवहारांची माहिती जमा करत त्याआधारे रेडी-रेकनरमधील दरापेक्षा पुणे शहरात, ग्रामीण भागात आणि नगरपालिका हद्दीत जादा दराने व्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पुढील वर्षीच्या रेडी-रेकनरमध्ये (२०२३-२४) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वाढ प्रस्तावित केली आहे.

Pune City
नाशिक शहरातील दोन हजार किमीचे रस्ते होणार काँक्रिटचे

हवेली आणि मुळशी तालुक्‍यातील शहरालगतच्या गावांत रेडी-रेकनरमधील दरापेक्षा १० ते १४ टक्के वाढीव दराने व्यवहार होत आहेत. मात्र इंदापूर व दौंड तालुक्‍यातील हे प्रमाण २ ते ४ टक्के असल्याचे आढळून आले. आळंदी नगरपालिका हद्दीत मात्र हे प्रमाण जास्त असून तेथे सरासरी २३.५० टक्के जादा दराने व्यवहार झाले आहेत. तर तळेगाव दाभाडे या नगरपालिका हद्दीत २३ टक्के इतक्‍या जादा दराने व्यवहारांच्या नोंदी झाल्या.

Pune City
Nashik: वाहक पुरवण्यासाठी 'सिटीलिंक' नेमणार नवीन ठेकेदार; कारण...

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पुणे शहराच्या रेडी-रेकनर दरात सरासरी ६ ते १९ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरात ८ ते १० टक्के आणि ग्रामीण भागात १५ ते १६ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. या दरवाढीला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली तर येत्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच एक एप्रिलपासून हे दर लागू होणार आहे.

Pune City
'ज्ञानदीप'ला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे आदेश कोणाचे? पटोलेंचा घणाघात

ठिकाण - व्यवहार दर
पुणे शहर - ६.४९ टक्के जादा
उपनगर - १० ते १५ टक्के जादा
पेठा - १० ते १६ टक्के कमी
पिंपरी चिंचवड - १२ टक्के जादा
पुणे ग्रामीण भाग - ९.२ टक्के जादा
नगरपालिका हद्द - १४ टक्के जादा

Pune City
फडणवीसांच्या लाडक्या योजनेचे कमबॅक; मंत्रिमंडळाचा 'ग्रीन सिग्नल'

पेठांमध्ये कमी दराने व्यवहाराची कारणे
- अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी
- अपुरी पार्किंग व्यवस्था
- दाटीवाटीचे क्षेत्र, सुविधांचा वाणवा
- पेठांपेक्षा उपनगराकडे वाढता कल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com