Pune: खासदार सुप्रिया सुळेंची 'ती' मागणी पालिका मान्य करणार का?

Supriya Sule
Supriya SuleTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील नागरिकांना मिळकत कर (Property Tax) समावेशाच्या तारखेपासून पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा. याबाबतचा महाराष्ट्र महापालिका अधिनियम १२९ अ (१) संबंधित भागांतील औद्योगिक क्षेत्र व व्यावसायिक गाळ्यांसाठीही लागू करावा. त्यानंतरच्या वर्षापासून महापालिकेच्या दराने करआकारणी व्हावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

Supriya Sule
Pune: पालिकेचा दावा खरा की खोटा? नगर रोड अतिक्रमणमुक्त झालाय का?

बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे, धायरी, वडगाव, खडकवासला या गावांतील नागरिकांनी याबाबत सुळे यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहिले आहे.

सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन दोडके, बाबा धुमाळ, अतुल दांगट, विकास दांगट, अविनाश जोगदंड, संजय धावडे, अतुल धावडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासमवेत बैठक घेतली. त्यात सविस्तर चर्चा झाली.

Supriya Sule
Pune: 'ती' बातमी आली अन् वाघोलीकरांचा जीव भांड्यात पडला; कारण...

सध्या महापालिकेत गाव समावेश झाल्यानंतर पुढील दर वर्षी मार्च महिन्यापासून सर्वसाधारण कर व इतर सेवाकर यांच्या एकत्रित बेरजेसह ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण करातील उर्वरित रकमेच्या २० टक्के वाढीसह कर सध्या आकारण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com