Pune : मुळशीतील 'या' 21 गावांची पाणी योजना का आली धोक्यात; ठेकेदारही अडचणीत

Pune ZP
Pune ZPTendernama

पुणे (Pune) : मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील २१ गावे आणि वाड्यावस्त्यांतील ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टी वसुलीची तब्बल दोन कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ‘महावितरण’चे (MSEB) ४९ लाखाचे वीजबिल आणि ठेकेदाराची (Contractor) ४० लाखांची बिलेही रखडली आहेत. वसूलीअभावी ही योजना, तसेच ठेकेदारही अडचणीत आले आहेत. त्यामुळे थकीत पाणीपट्टी वसूल न झाल्यास योजना बंद पडण्याची शक्यता आहे.

Pune ZP
Mumbai : कोस्टल रोडसाठी आणखी 6 महिन्यांची प्रतीक्षा; खर्चातही 725 कोटींची वाढ

तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील २१ गावे आणि वाड्यावस्त्यावर पाणी पोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना राबविली. या योजनेमुळे गावे, वाड्या वस्त्यांवर पाणी पोचले. परंतु, पाणी वापरूनही पाणीपट्टाची बिले ग्रामस्थ वेळेवर ग्रामपंचायतीत भरत नाहीत. परिणामी ग्रामपंचायतींनाही ही बिले जिल्हा परिषदेत भरता येत नाही. पाणीपट्टी थकल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ या विभागाच्या प्रशासनावर आली आहे.

Pune ZP
मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट; गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार...

ही योजना चालविण्यासाठी दरमहा १४ लाख रुपयांची आवश्यकता असते. तथापी जुलै अखेरपर्यंत दोन कोटी ४३ लाख ९२ हजार ७९ रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. तर, महावितरणलाही ऑगस्टअखेर ४० लाख रुपये वीजबिल भरावयाचे आहे. त्याचप्रमाणे ही योजना चालविण्यासाठी विविध ठेकेदारांचीही चाळीस लाख रुपयांची बिले थकलेली आहेत.

यापूर्वी जिल्हा परिषद निधी आणि शासन प्रोत्साहन अनुदान देऊन या योजनांकरिता मदत देत होती. परंतु, गेली दोन वर्षांपासून हे अनुदान मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीवरच या योजनेतील महावितरणचे बील आणि इतर तांत्रिक खर्चाची तरतूद होऊ शकते.

Pune ZP
Pune : चांदणी चौकातील पुलाच्या उद्‍घाटनानंतर पालिकेला उपरती, आता...

वेळेत पाणीपट्टी भरणाऱ्यांनाही भुर्दंड

महावितरणची थकबाकी राहिल्यास किंवा इतर तांत्रिक अडचणी आल्यास संपूर्ण पाणीपुरवठा बंद होत असतो. पिरंगुटसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम काही ग्रामपंचायती पाणीपट्टीची बिले वेळेत भरत असतात. परंतु, पाणी योजना बंद राहिल्यास त्यांनाही वेळेत बिले भरूनही खंडित पाणीपुरवठ्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गावासाठी पाणी सोडण्याची स्वतंत्र सोय होणे गरजेचे आहे. जेणेकरून ज्या ज्या गावांची पाणीपट्टी थकबाकी आहे, अशाच गावांचा पाणीपुरवठा खंडित करणे सोयीचे होईल. तसेच, वेळेवर पाणीपट्टी भरणाऱ्या गावांवरही अन्याय होणार नाही.

Pune ZP
Pune : PMPML प्रशासन सरसावले; आता ठेकेदारांच्या बसवर...

मुळशी तालुक्यातील विविध गावांची जुलै अखेरपर्यंतची थकबाकी पुढीलप्रमाणे -

माले- ६९,३९६, संभवे- ३७,०००, जामगाव दिसली- ३,४०,०७५, अकोले- ३७,०००, कोंढावळे- ११,०६,५८१, पौड- विठ्ठलवाडी- १,२७,०३,९१०, भादस-शिळेश्वर- १२,८६,१६८, असदे- १,६७,८२४, खुबवली- ७,७०,१७४, रावडे-हुलावळेवाडी- १,०२,०००, दखणे- १,८०,५४६, चाले-करमोळी-सावरगाव- १,१५,५७२, दारवली- ९,८०,१४१, मुगावडे- १,५९,७५७), अंबडवेट- १,०७,३८०, भरे- २,२२,२६०, पिरंगुट- २६,९०,७३२, कासारआंबोली- ७,१४,२२०, घोटावडे- २६,२०,७६३, मुलखेड- १५,८८०.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com