Pune: अपघातांनंतरही अतिक्रमणे हटविण्यास पालिकेला वेळ का मिळेना?

Navale Bridge
Navale BridgeTendernama

पुणे (Pune) : कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रस्ता रुंदीकरणासह विविध उपाययोजनांची अंमलबाजवणी करण्यात येत आहे.

Navale Bridge
Nashik: ...असे आहेत नाशिक शहराबाहेरून जाणारे 2 रिंगरोड?

दरम्यान, या महामार्गालगत असणाऱ्या कात्रज बोगदा, स्वामीनारायण मंदिर ते भूमकर चौकापर्यंत सेवा रस्त्यांवरील अतिक्रमण दूर करावे. तसेच भूसंपादनाची आवश्यकता असल्यास तसा प्रस्ताव करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने पुणे महापालिकेला दिले आहेत.

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष समिती स्थापन केली होती. तसेच एका खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल तयार केला आहे.

या समितीने काढलेल्या निष्कर्षांमध्ये सेवा रस्त्यांलगत असणारे महाविद्यालय, त्यांचे वाहन पार्किंग, हॉटेल्स, छोटे उपहारगृह, हॉस्पिटल आणि इतर पथारीवाले यांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. तसेच भुयारी मार्ग आणि रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यांऐवजी प्रवासासाठी महामार्गाचा वापर करत असून वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Navale Bridge
सरकारच्या 'त्या' निर्णयाचा मुंबईतील 25 ते 30 बिल्डरांना लाभ?

या पार्श्‍वभूमीवर कात्रज बोगदा ते नवले पूलापर्यंत असणारे अतिक्रमण काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेच्या केल्या आहेत. तसेच सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करून मोकळे करण्यासाठी आवश्यकतेनुसार भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली आहे.

कात्रज बोगद्यापासून नवले पूल ते भूमकर चौकापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेकडून नोटीस देऊन तात्पुरती कारवाई करण्यात आली. तर छोट्या व्यावसायिकांवर थेट कारवाई करत अतिक्रमण हटविण्यात आले.

प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अशा अतिक्रमणधारकांची स्वतंत्र यादी तयार करून आयुक्तालयात पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, महापालिकेकडून प्रत्यक्षात कुठलीच कार्यवाही होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com