Pune : पुणे-नगर रस्त्याने बीआरटीला का केला 'टाटा'? आता तरी कोंडी फुटणार का?

Nagar Road
Nagar RoadTendernama
Published on

वडगाव शेरी (Wadgaon Sheri) : पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Pune Nagar Road Traffic) आणि अपघाताला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी (BRT) मार्गिका शनिवारी उशिरा काढण्यास सुरुवात करण्यात आली.

Nagar Road
Mumbai : अवघ्या 30 मिनिटांत आता मुंबईहून ठाण्यात! हे शक्य आहे का?

शनिवारी रात्री सोमनाथनगर चौक, खराडी बायपास व आपले घर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी येरवडा ते विमाननगर चौकापर्यंत बीआरटी हटवण्यात आलेली आहे.

पुणे-नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गिकेमुळे वर्षानुवर्षे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल पाठपुरावा करणारे आमदार बापूसाहेब पठारे यांनी धोकादायक बीआरटी काढण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच प्रशासनासोबत अनेक बैठकाही घेतल्या होत्या.

माजी आमदार सुनील टिंगरे यांनी ही समस्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही मांडली होती. अजित पवार यांनी याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.

Nagar Road
Mumbai : म्हाडाच्या 'त्या' पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने टेंडर काढा

वडगाव शेरी नागरिक मंच, शिरूर तालुका मित्रपरिवार या स्वयंसेवी संस्थांनी आणि स्थानिक नागरिकांनीही उर्वरित आणि अर्धवट असलेली बीआरटी काढण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती.

रस्त्यात यू टर्न करणार

महापालिकेच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गेल्या आठवड्यात बीआरटी काढण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. पोलिस विभागाच्या मागणीनुसार बीआरटी मार्गिका काढून तिथे यू टर्न सुविधेची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Nagar Road
Pune : पुलाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे

पुणे-नगर रस्त्यावरील नागरिक, वाहनचालक व व्यावसायिकांना या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com