Pune : पुण्यातील 'या' रस्त्यावर का लागताहेत वाहनांच्या रांगा?

Pune Traffic
Pune TrafficTendernama

पुणे (Pune) : नऱ्ह्यात सातत्याने वाहतुकीची कोंडी (Traffic) निर्माण होत आहे. धायरी फाटा ते नऱ्हेगाव रस्त्यावरील (Dhayri Phata - Nhare Gaon Road) आर्यन वर्ल्ड शाळेजवळील एका विद्युत खांबाचा वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागून वाहतूक ठप्प होते.

याकडे महावितरण व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसच उपलब्ध नसल्याने कोंडीचा हा प्रश्न गंभीर बनला आहे.

Pune Traffic
Sambhajinagar : वाळूजजवळील 'या' 18 खेड्यांचा 32 वर्षांनंतर होणार कायापालट

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत बांधकामे झाली आहेत. तसेच रस्त्यालगत झालेल्या बांधकामांचे प्रमाण अधिक आहे. इमारतींच्या समोर रस्त्याच्या बाजूला कमी अंतर ठेवून व्यावसायिक गाळे असल्याने रस्ता खूप अरुंद आहे. रस्त्यावर असणारे विद्युत खांब, अरुंद रस्ते यामुळे रोजच वाहतूक ठप्प होत असते.

त्यातच या मार्गावर सतत अवजड वाहनांची ये-जा असते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी विद्युत खांब आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याबाबत पोलिस प्रशासन व महावितरण यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

हा विद्युत खांब काढण्यासाठी महावितरणने अद्याप कुठलीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून येते. त्यातच नऱ्ह्यात अनधिकृत वाहतुकीचे थांबे असून, वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच रिक्षा व दुचाकीस्वार पुढे जाण्याच्या घाईत वाहतूक ठप्प करीत आहेत.

Pune Traffic
Nashik : सिन्नर MIDC होणार नाशिकमधील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत; एकरी 52 लाखांचा दर

महापालिका व पुणे जिल्हा नियोजन समितीने आमदार फंडातून आम्हाला निधी उपलब्ध करून दिला तर आम्ही विद्युत खांब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू शकतो. हे खांब रस्ता रुंदीकरणाच्या अगोदरचे आहेत. आम्ही लवकरच ते काढून वाहिन्या भूमिगत करणार आहोत.

- अविनाश कलढोणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, वडगाव उपविभाग महावितरण

धायरी फाटा ते नऱ्हेगाव रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे रोजच वाहतूक कोंडी होते. महावितरणने रस्त्यावरील खांब काढून दुसरीकडे हलवावेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.

- सौरभ सुराणा, नऱ्हे

महावितरणने या भागातील रस्त्यावरील विद्युत खांब हटवून भूमिगत वाहिन्या टाकाव्यात. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटेल.

- श्रीनिवास आखाडे, सामाजिक कार्यकर्ते, धायरी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com