Pune : पदपथ नक्की कोणासाठी? पादचाऱ्यांसाठी का वाहन पार्किंगसाठी?

PMC : सेवा रस्त्याच्या पदपथावर दररोज ५० ते ६० वाहने उभी केलेली दिसून येतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर चालावे लागते.
PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : वारज्यातील विविध परिसरांतील पदपथांवर चारचाकी वाहनासह दुचाकीचे सर्रास पार्किंग केले जाते. त्यामुळे हा पदपथ पादचाऱ्यांसाठी आहे की वाहन पार्किंग साठी आहे, असा प्रश्‍न वारज्यातील पादचाऱ्यांना पडला आहे. तसेच या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

PMC Pune
राज्यात 'या' ठिकाणी होणार आणखी एक आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट

वारज्यातील महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावर महापालिकेने नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त असे पदपथ बनविले आहेत. या पदपथाशेजारी ‘नो पार्किंग’चे फलकही लावलेले आहेत, मात्र याकडे दुर्लक्ष करून काही बेशिस्त नागरिक बिनधास्तपणे पदपथावर पार्किंग वाहने पार्क करीत आहेत. यामध्ये खासगी वाहनांबरोबर शासकीय कामासाठी असणाऱ्या वाहनांचेही पार्किंग होत असल्याने नागरिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

सेवा रस्त्याच्या पदपथावर दररोज ५० ते ६० वाहने उभी केलेली दिसून येतात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी चालायला येणाऱ्या नागरिकांना पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर चालावे लागते. याबाबत वाहनचालकाला काही विचारले, तर ते भांडण सुरू करतात. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांवर लवकरात लवकर कारवाई करून पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

PMC Pune
Pune : राज्यातील केवळ चार शहरे पुण्याशी विमानसेवेने जोडली असल्याने आता...

दुचाकींचे प्रमाण जास्त

पदपथावर पार्क केल्या जाण्याऱ्या वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त आहे. कामावर जाणारे अनेक नागरिक याच सेवा रस्त्याच्या पदपथावर आपली दुचाकी पार्क करून कामाच्या ठिकाणी जातात. येथील एक हॉटेलजवळील पदपथावर जवळपास शेकडो दुचाकी अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना या पदपथावर जाणेही कठीण होत आहे.

पदपथावर वाहने पार्क होत असलेली ठिकाणे

- सुवर्णा हॉटेलजवळील पदपथ

- अतुलनगरजवळील असणारा पदपथ

- दोडके डेअरी जवळील असणारा पदपथ

- शोभापुरम सोसायटीजवळील पदपथ

- माई मंगेशकर रुग्णालयाजवळील पदपथ

PMC Pune
पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाचा ‘प्रवास’ गेल्या सात वर्षांपासून कागदावरच

आम्ही दररोज सकाळी-संध्याकाळी या पदपथावर फिरण्यासाठी येत असतो, मात्र पदपथावर अनेक ठिकाणी चारचाकी वाहने उभी असल्याने आम्हाला चालण्यासाठी अडचण येते. याबाबत महापालिकेने व वाहतूक विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.

- जितेंद्र गिरी, स्थानिक नागरिक, वारजे

आपल्याकडे दुचाकी उचलण्यासाठी वाहन आहे. मात्र चारचाकी उचलण्यासाठी वाहन उपलब्ध नाही. तरीसुद्धा पदपथावर पार्क केलेल्या वाहनांवर कडक कारवाई केली जाईल.

- विक्रम मिसाळ, सहाय्यक पोलिस निरिक्षक, वारजे वाहतूक विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com