Pune: वा रे कारभार; आयुक्त साहेब मग 'या' मार्गावर BRT कधी धावणार?

Vikram Kumar, PMC
Vikram Kumar, PMCTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील ‘बीआरटी’ला (Bus Rapid Transist - BRT) बळ देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बोपोडी ते वाकडेवाडी (Bopodi To Wakdewadi Road BRT) या रस्त्यावर नव्याने बीआरटी मार्ग निर्माण करण्याचे महापालिका (PMC) प्रशासनाने निश्‍चित केले आहे. त्यासाठीची भूसंपादन प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. मात्र रस्ता मोठा करण्यासाठी जादा कालावधी लागणार असल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तरी या मार्गावरून बस धावण्याची कुठलीही चिन्हे नाहीत.

Vikram Kumar, PMC
Nashik : सिटीलिंक बससेवा ठप्प; दोन वर्षांत 70 कोटींचा तोटा

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत या वर्षी ‘बीआरटी’चे नवीन तीन मार्ग तयार केले जाणार आहेत. त्यात दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती शक्ती (पिंपरी-चिंचवड) आणि बोपोडी ते वाकडेवाडी (पुणे) या मार्गांचा समावेश आहे. तिन्ही मार्गांची लांबी १७.५ किलोमीटर इतकी आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता व ‘पीएमपी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गाची संयुक्त पाहणीही केली होती.

पुणे कँटोन्मेंट बोर्ड व अन्य संस्थांकडून रस्ता रुंदीकरण व बीआरटी मार्गासाठी सहकार्य करण्यात आले. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी आवश्‍यक संपूर्ण जागादेखील महापालिकेच्या ताब्यात आली आहे. रस्त्याचे काम मोठे असल्याने बीआरटी व त्यासाठीच्या आवश्‍यक कामासाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे.

Vikram Kumar, PMC
Nagpur : गणेश टेकडी उड्डाणपूल तोडणे सुरु;  त्या जागी होणार...

असा होईल फायदा

- प्रवासाच्या वेळेत होणार बचत

- सुरक्षित प्रवास करणे शक्‍य होईल

- बसच्या फेऱ्या वाढतील

- टायरची झीज, ब्रेकडाउनचे प्रमाण कमी होईल.

- सीएनजी, डिझेलमध्ये बचत होईल

- एसटी, खासगी बसमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होणार फायदा

Vikram Kumar, PMC
Nashik:जुनी देयके दिल्याशिवाय नवीन कामे मंजूर करू नका;कोणाची मागणी

बोपोडी ते वाकडेवाडी या दरम्यान रस्ता रुंदीकरण, बीआरटी मार्गासाठी संपूर्ण जमीन ताब्यात आली आहे. सध्या हा रस्ता २१ फूट आहे, तो ४२ फूट केला जाणार आहे. त्यासाठी ८५ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. पुढील वर्षभर तरी हे काम पूर्ण होणार नाही.

- व्ही. जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com