Pune: वडगाव शेरीतील रस्ते विकासासाठी मोठा निर्णय; प्रस्ताव मंजूर

PMRDA TP Scheme
PMRDA TP SchemeTendernama

पुणे (Pune) : वडगाव शेरी (Vadgaon Sheri) परिसरातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी जागामालक जागा देत नसल्याने व त्याचा परिणाम या परिसरावर होत असल्याने अखेर या ठिकाणी नगररचना परियोजना (TP Scheme) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास आज आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजुरी दिली.

PMRDA TP Scheme
Nitin Gadkari : देशात पहिली ब्रॉडगेज मेट्रो या शहरांदरम्यान धावणार

पुणे महापालिका हद्दीत वडगाव शेरी या गावाचा समावेश १९९७ मध्ये झाला आणि विकास आराखडा २००५ मध्ये जाहीर झाला. २००७ मध्ये यास अंतिम मान्यता मिळाली. तेव्हापासून वडगाव शेरीतील जागामालक रस्त्यासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादन करण्यास तयार होत नाहीत.

PMRDA TP Scheme
Aurangabad: 'या' रस्त्याने का घातली औरंगाबादकरांना भुरळ?

या गावामधील रस्ते विकसित करून टीपी स्कीम राबविणे आवश्यक असल्याने वडगाव शेरीतील सर्व्हे क्रमांक १७ /१ /३ब , १०/४ , ११/ १ /२ /३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टीपी स्कीम करावी, अशी मागणी माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी केली होती.

त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला. त्याला शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com