Pune : बेशिस्त पुणेकरांनी वर्षभरात भरला 2 कोटींचा दंड; कारण काय?

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, असे महापालिका (PMC) प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार सूचना देऊनही कचरा रस्त्याच्या कडेला फेकण्याचा प्रकार काही थांबण्याची चिन्हे नाहीत. यामुळे मागील वर्षभरात सुमारे ४८ हजार जणांनी महापालिकेकडे एक, दोन लाख नव्हे तर तब्बल एक कोटी ९८ लाख रुपयांचा दंड भरला आहे. ‘दंड भरू, पण कचरा रस्त्यातच टाकू’ अशा बेशिस्तीचा अनुभव महापालिका प्रशासनाला येत आहे.

Pune
पुणे रिंग रोडवरील 'त्या' गावांमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन; 'एमएसआरडीसी'कडे जबाबदारी

शहरात स्वच्छता कायम राहण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काही वर्षांपासून ‘कंटेनरमुक्त शहर’ करण्यात आले. ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था करून देण्यात आली. त्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून कचरावेचकांकडून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याबरोबरच त्यातील ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे कामेही करण्यात येऊ लागली. त्यामुळे शहरातील चौकांमध्ये असणाऱ्या कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या.

तसेच संबंधित ठिकाणी ‘सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये’ अशा सूचनांचे फलक लावून महापालिकेकडून जनजागृतीवर भर देखील देण्यात आला. असे असतानाही रस्त्यांवर, चौकात, पूल, बसथांबे अशा ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत.

Pune
Satara : बापरे! शालेय गणवेशांचे कंत्राटही गेले अन् 14 कोटीही गेले

महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, १ ऑक्‍टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्या ४७ हजार ७९४ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ९८ लाख ३३ हजार ४१६ रुपये इतका दंड महापालिकेच्या घनकचरा विभागाने वसूल केला आहे.

तरीही नागरिक रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबवत नसल्याची चिन्हे आहेत. कचरा टाकण्याच्या ठिकाणांवर (क्रॉनिक स्पॉट) महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवले जात असून त्याद्वारे बेशिस्तांवर कारवाई करण्यावर भर दिला जात आहे.

कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष

शहराच्या अनेक भागांत कचरा उचलण्याकडे महापालिकेचेही दुर्लक्ष होते. कचरा उचलण्यास उशीर झाल्यास ठिकठिकाणी ढिगारे साचतात. अशा ढिगाऱ्यांवर ये-जा करताना नागरिकांकडून कचरा टाकला जातो. तर तेथे स्वच्छता केल्यास कचरा टाकण्यास नागरिकही धजावत नसल्याचेही चित्र निदर्शनास येते.

Pune
Pune : प्रशासनाने आमचे पुनर्वसन दुसरीकडे करून गावच रिकामे करून घ्यावे! का संतापले नागरिक?

स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी काम सुरू

केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये इंदूर शहराकडून अव्वल क्रमांक पटकाविला जात आहे. तर, पुणे शहराला अद्याप अव्वल स्थानाने हुलकावणी दिलेली आहे. त्यादृष्टीने यंदा स्वच्छ सर्वेक्षणासाठीही शहरातील स्वच्छतेला अधिकाधिक प्राधान्य दिले जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

नागरिकांनी आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यापुढे देखील ही कारवाई कायम राहील.

- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नव्हे, तर अन्य प्रकारची कारवाई केली पाहिजे. तरच बेशिस्त नागरिकांमध्ये सुधारणा होईल.

- विजय भोसले, नागरिक

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com