Pune : पुण्यात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांनो सावधान! आता...

Vikram Kumar, PMC
Vikram Kumar, PMCTendernama

पुणे (Pune) : उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्यांवर पूर्वी फक्त १८० रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र, आता ही दंडाची रक्कम तिप्पट वाढून थेट ५०० रुपये करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

Vikram Kumar, PMC
Nashik : सिन्नरच्या मुसळगाव-माळेगाव एमआयडीसीना रिंगरोडने जोडणार

शहरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन सार्वजनिक ठिकाणी कचरा पडू नये, यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, तेथे कर्मचारी नियुक्त करून यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही बेशिस्त नागरिकांच्या वागण्यात सुधारणा झालेली नाही.

Vikram Kumar, PMC
जालना-मुंबई वंदे भारत : मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे दुहेरीकरणासाठी 1 हजार कोटी

सध्या उघड्यावर कचरा टाकल्यानंतर १८० रुपये दंड वसूल केला जातो, पण ही रक्कम इतर दंडाच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे नागरिकांवर धाक बसवा यासाठी आता दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही दंडाची रक्कम ५०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे, असे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com