Pune : पुणे शहरातील 'ते' रस्ते लवकरच होणार सुसाट; कारण...

Pune City
Pune CityTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) शहरातील १५ आदर्श रस्ते करण्यात आले. मात्र रस्त्यांवरील पार्किंग, अतिक्रमणे व अन्य अडथळे कायम आहेत. ते दूर करून संपूर्ण रस्ता वापरात आणण्यासाठीचे नियोजन महापालिका व पोलिस प्रशासनाकडून केले जाणार आहे.

Pune City
Ajit Pawar : अजित दादांनी पिंपरी-चिंचवडसाठी दिली आणखी एक गुड न्यूज!

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांची गुरुवारी (ता. २०) महापालिकेत बैठक झाली. या वेळी भोसले व पाटील यांनी रस्ता रुंदीकरण व पुढील नियोजनाची माहिती दिली. या वेळी अपर आयुक्त महेश पाटील, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका व पोलिसांनी संयुक्त पद्धतीने रस्त्यांची निवड करून तेथे विविध प्रकारची कामे केली होती. त्याअंतर्गत महापालिकेने शहरातील १५ रस्त्यांची कामे करण्यावर भर दिला होता. त्यामध्ये रस्त्यांवरील खड्डे, चेंबरची झाकणे समपातळीला आणणे, रस्त्यांमधील चढ-उतार दुरुस्त करणे या स्वरूपाची कामे केली होती. याबरोबरच ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या नियमानुसार रस्त्यांची रचनाही केली होती.

Pune City
Pune : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'या' स्थानकांवर बसविणार डिजिटल डिस्प्ले बोर्ड

महापालिकेने केलेल्या या कामांमुळे रस्त्यांवरील वाहतुकीची गती व वाहनांची संख्या वाढली. आता या रस्त्यांवरील पार्किंग, अतिक्रमणे, रिक्षा व बसथांबा याबाबतची कामे करून संपूर्ण रस्ता वापरात यावा, यादृष्टीने नियोजन केले जात असल्याची माहिती डॉ. भोसले व मनोज पाटील यांनी दिली.

मनोज पाटील म्हणाले, ‘‘रस्ते दुरुस्त झाल्याने वाहनांची गती वाढली. याबरोबरच खासगी बसला शहरातील मुख्य रस्त्यांवर थांबण्यास व प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी झाली आहे. आता संबंधित रस्ते पूर्णपणे वापरात कसे येतील, यादृष्टीने पोलिस आणि महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.’’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com