Pune: 4 ते 15 जुलै दरम्यान चांदणी चौकातील वाहतुकीत होणार 'हा' बदल

Chandani Chowk
Chandani ChowkTendernama

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक सेवा रस्त्यावर वळविण्यात येणार आहे.

Chandani Chowk
खूशखबर! सिंहस्थापूर्वी नाशिक शहराबाहेरून होणार दोन रिंगरोड

४ जुलै ते १५ जुलै या कालावधीसाठी हा बदल असेल. या दरम्यान रात्री साडेबारा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत वाहतूक सेवा रस्त्यावर वळविली जाईल. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पर्यायी सेवा रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुलाच्या कामाच्या अनुषंगाने वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.

Chandani Chowk
Nashik ZP: उप ठेकेदारांना कामे देणाऱ्यांवर खरंच कारवाई होणार का?

ही वाहने थांबविणार...
चांदणी चौक येथे मुख्य महामार्गावरील वाहतूक रात्री तीन तास महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीत केवळ मल्टी एक्‍सेल वाहनांची वाहतूक ३ तासांसाठी रोखण्यात येईल. ही वाहने मुंबई एक्‍स्प्रेस-वे, तळेगाव टोलनाका व मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोलनाका येथे थांबवली जातील. तर साताऱ्याकडून येणारी वाहने खेड शिवापूर टोलनाक्यावर थांबवली जातील.

Chandani Chowk
Nagpur : आता एम्समध्ये इंजेक्शन खरेदी घोटाळा उघड; दोघांना अटक

हलकी वाहने, बससाठी सेवा रस्ता
पुणे-सातारा मुख्य महामार्गावरील वाहतूक बंद केल्यानंतर हलकी वाहने, बस आणि ट्रक दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचा वापर करतील. मुंबईकडून सातारा अथवा कोथरुडकडे जाण्यासाठी वाहने नव्याने तयार केलेले सेवा रस्ता व रॅम्प - ६ चा वापर करतील. तसेच सातारा व कोथरूड मार्गे मुंबई व मुळशीकडे जाण्यासाठी वेदभवन बाजूने नव्याने तयार करण्यात आलेला सेवा रस्ता व रॅम्प- ८ चा वापर करण्यात यावा. इतर वाहतुकीत कोणतेही बदल नाहीत. त्यामुळे कुठलीही वाहतूक थांबणार नाही, अशी माहिती प्रकल्प संचालक कदम यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com