Pune : चर्चा तर होणारच! पण 'मूळशी पॅटर्न' नव्हे तर 'भूगाव पॅटर्नची'!

Bhugaon (File)
Bhugaon (File)Tendernama

पुणे (Pune) : भूगाव (ता. मुळशी) (Bhugaon, Tal. Mulashi) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदान करीत गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण केले. नम्रतेने वाहतूक नियंत्रण करीत गावकारभाऱ्यांसह युवकांनी पंधरा दिवस चोवीस तास राबत दर्जेदार रस्ता तयार केला. एकीकडे ‘मुळशी पॅटर्न’मुळे (Mulashi Pattern) तालुक्याचे नाव वेगळ्या अर्थाने गाजत असताना भूगावच्या ग्रामस्थांनी एकजुटीतून सामाजिक बांधिलकीचा ‘अनोखा भूगाव पॅटर्न’ उभा केला आहे. प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे महामार्गाचे काम इच्छाशक्तीच्या जोरावर स्वखर्चाने करणारे भूगाव हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे.

Bhugaon (File)
Nashik-Pune मार्गावर शिवशाही बंद झाल्याने आता 'हा' आहे नवा पर्याय

चांदणी चौकातून कोकणाकडे जाणारा रस्ता चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. तेव्हापासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे, परंतु ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासनाचा उदासीन कारभार यामुळे ठिकठिकाणी महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडलेले होते. त्यात भूगाव तालुक्याचे प्रवेशद्वार असून, गावातूनच महामार्ग जात असल्याने अरुंद, अपूर्ण रस्ता, खाचखळग्यांमुळे दररोज प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे स्थानिक भूगावकरांचीही डोकेदुखी वाढत होती.

रस्त्याबाबत गतवर्षी ९ ऑगस्टला ग्रामपंचायतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन केले होते, परंतु ठेकेदार आणि ‘एमएसआरडीसी’कडून केवळ आश्वासनाचाच पाऊस पडला. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना गैरसोय आणि मनःस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे गावातील गावकारभारी एकत्र आले. त्यांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून हा रस्ता पूर्ण करण्याचा संकल्प केला. सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केला. स्थानिक व्यावसायिक आर्थिक मदतीसाठी पुढे आले. त्यामुळे २७ जुलैपासून गावकऱ्यांनी कामाला सुरूवात केली.

Bhugaon (File)
वैभववाडी-कोल्हापूर 3400 कोटींच्या रेल्वे मार्गास PM गतीशक्तीची शिफारस

जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, राहुल शेडगे, निकीता रमेश सणस, अर्चना सुर्वे, दिनेश सुर्वे, कालिदास शेडगे, विशाल भिलारे, योगेश चोंधे, संकेत कांबळे, सुरेखा शेडगे, वैशाली महेश सणस, सुनीता चोंधे, जितेंद्र इंगवले, जीवन कांबळे यांच्यासह कर्मचारी आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरले.

पूर्वीचा साडेचार मीटर रुंदीचा रस्ता आता सात मीटर झाला असून, दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरल्यानंतर त्याची रुंदी दहा मीटर होणार आहे. कॉंक्रिटीकरणाच्या गुणवत्तेची चाचणी केल्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला गेला. सुमारे पंचाहत्तर लाख रुपये खर्चून बांधलेल्या या रस्त्याचे पंधरा दिवस सतत काम केलेल्या युवकांच्याच हस्ते लोकार्पण झाले.

Bhugaon (File)
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती! सरकार बॅकफूट वर

बेशिस्त चालकांवर ‘नम्रतेचा’ बडगा

काम करीत असताना सर्वात मोठी समस्या होती ती वाहतूक कोंडीची, परंतु गावातील शेकडो युवकांनी दिवस-रात्र ऊन-पावसात उभे राहून वाहतूक नियंत्रित केली. दोन्ही बाजूला युवकांनी, गावकारभाऱ्यांनी चालकांना होत जोडून विनंती करीत वाहतुकीचे नियोजन केले.

बेशिस्त चालकांवरही नम्रतेचा बडगा उगारला. ठिकठिकाणी ध्वनीवर्धकाद्वारे सूचना दिल्या. युवकांची कष्टाळू, सामाजिक बांधिलकी पाहून छोटे-मोठे व्यावसायिक, सोसायटीतील नागरिक, स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी चहा, नाष्टा, जेवण पुरविले. सोसायटीतील उच्चशिक्षित महिला-पुरुषही वाहतूक नियंत्रणासाठी पुढे सरसावले.

Bhugaon (File)
Pune-Nashik Railway : चौथ्यांदा मार्ग बदलणार?; काय आहे कारण...

अर्धवट काम, खाचखळगे यामुळे दररोज भूगावमध्ये वाहतूक कोंडी व्हायची. त्याचा स्थानिक ग्रामस्थांनाही त्रास होत होता. प्रशासनाकडे वेगवेगळ्या प्रकारे मागणी करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने लोकवर्गणीतून श्रमदान करीत हा रस्ता पूर्ण केला.

- शांताराम इंगवले, माजी गटनेते जिल्हा परिषद, पुणे

या रस्त्याच्या कामासाठी गावातील प्रत्येकाने काही ना काही हातभार लावला. गावातील युवक तर वाहतूक नियंत्रणासाठी चोवीस तास रस्त्यावर उभे होते. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या दुचाकी - चारचाकी चालकांनी, प्रवाशांनी वाहतूक नियंत्रणासाठी आम्हाला खूप सहकार्य केले. काम करणाऱ्यांना चहा, पाणी, नाष्टा, जेवण पुरविणाऱ्यांचीही योगदान मोठे आहे.

- अर्चना सुर्वे (सरपंच, भूगाव)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com