Pune : पुण्यातील 'तो' प्रश्नही अखेर मार्गी लागला; काम अंतिम टप्प्यात

PMC
PMCTendernama

पुणे (Pune) : जैववैद्यकीय कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करण्यासाठी पुणे महापालिका (PMC) आणि पास्को एन्व्हायर्न्मेंटल सोल्यूशनतर्फे पुणे रेल्वे स्थानक परिसरात साकारलेल्या कचरा विघटन प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पात सध्या काही प्रमाणात जैववैद्यकीय कचऱ्याच्या विघटनाचे काम सुरू असून, २६ लाख किलोग्रॅमहून अधिक जैववैद्यकीय कचऱ्याचे विघटन करण्यात आले. त्यामुळे भविष्यात जैववैद्यकीय कचरा प्रक्रियेची समस्या कमी होणार आहे.

PMC
तगादा : रेल्वे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे 'हे' स्टेशन आहे काळोखात

कोरोना काळात पुण्यात जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. हे लक्षात घेत जैववैद्यकीय कचऱ्यावर पुण्यातच विघटन प्रक्रिया करता यावी, म्हणून हा प्रकल्प निर्माण केला आहे. या प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित १० टक्के काम बाकी आहे. ते होताच प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल. प्रायोगिक तत्त्वावर विघटन प्रक्रियेचे काम होत असून, मशिनची कार्यक्षमताही चांगली आहे, असे ‘पास्को’ कंपनीचे संचालक सुनील दंडवते यांनी सांगितले.

२६ लाखांहून अधिक किलो कचरा संकलन

पुण्यात या वर्षी जानेवारी ते २० नोव्हेंबरपर्यंत सुमारे २६ लाख ५० हजार किलोग्रॅम कचऱ्याचे संकलन केले गेले. यामध्ये मुदतबाह्य औषधे, प्रयोगशाळेतील टाकाऊ कचरा, रुग्णालयांद्वारे टाकण्यात येणारे वैद्यकीय साहित्य व उपकरणे यांचा समावेश आहे. संकलित कचऱ्यातील सुमारे १३ लाख ३६ हजार किलोग्रॅम कचऱ्यावर इन्सिनेरेशन, तर सुमारे १३ लाख १३ हजार किलोग्रॅम कचऱ्यावर ऑटोक्लेव्हच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात आली.

PMC
Ravindra Chavan : ठाणे, कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा

महत्त्वाच्या बाबी...

- सर्वाधिक जास्त जैववैद्यकीय कचऱ्याची निर्मिती ऑगस्टमध्ये

- ऑगस्टमध्ये २ लाख ७३ हजार ११५ किलोग्रॅम कचऱ्यावर प्रक्रिया

- दर महिन्याला सुमारे अडीच लाख किलो कचऱ्यावर प्रक्रिया

- प्रकल्पात इन्सिनेरेशन व ऑटोक्लेव्हच्या मशिनांचा वापर

PMC
Raigad : रायगड जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी; 'या' ठिकाणी सुरू होणार 200 खाटांचे सुपर स्पेशालिटी...

वर्षभरातील जैववैद्यकीय कचरा (किलोमध्ये)

महिने - एकूण कचरा

जानेवारी - २,४४,१९०

फेब्रुवारी - २,२९,८०१

मार्च - २,४८,८७०

एप्रिल - २,३७,१६७

मे - २,३७,२०८

जून - २,३८,०००

जुलै - २,५५,५२८

ऑगस्ट - २,७३,११५

सप्टेंबर - २,५४,२५६

ऑक्टोबर - २,७१,३९१

२० नोव्हेंबरपर्यंत - १,५८,३४३

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com