Ravindra Chavan : ठाणे, कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गांचा दर्जा

Ravindra Chavan.
Ravindra Chavan.Tendernama

मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील कल्याण शिळा निळजे (पलावा) ते नारीवली-बाळे-वाकळण-दहिसर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याच्या निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. आता या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिध्द झाला आहे.

Ravindra Chavan.
Exclusive : दादा भुसेजी चाललंय काय? ठेकेदारांची सोय पाहण्यामागे गुपित काय? (भाग-2)

कल्याण शिळ रोड तसेच निलजे-पलावा हे रोड सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहेत. परंतु पुरेशा निधी अभावी तसेच काही कायदेशीर तंट्यामुळे रस्त्याच्या बहुतांश भागांची देखभाल योग्य पध्दतीने होऊ शकत नव्हती व त्याचा फटका या परिसरातील वाहनचालक व नागरिकांना होत होता. लोढा परिसरातील कासा रिओ व कासा रिओ टाऊनशिप या परिसरात राहणाऱ्या हजारो रहिवाशांना या खराब रस्त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत होता.

Ravindra Chavan.
Mumbai : 'बेस्ट'चा दणका: अखेर 700 वातानुकूलित डबलडेकर ई-बसेसच्या मार्गातील अडथळा दूर

पुरेशा निधी अभावी या रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचा रस्ता म्हणून ओळखला जायचा. दुरावस्था झालेल्या या रस्त्याचा धोका हा वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत होता. परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्याने मंत्री चव्हाण यांनी रस्ते विशेष दुरुस्ती अर्थसंकल्पात १८.५ कोटीची तरतूद करण्याचे नियोजन केले आहे. मंत्री चव्हाण यांच्या या निर्णयामुळे कल्याण व ठाणे तालुक्यातील रस्ते लवकरकच अधिक दर्जेदार व सुस्थितीत होणार आहेत.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com