PUNE: ठेकेदारधार्जिण्या 'त्या' लोकप्रतिनिधींवर कारवाई करा

PMC Pune
PMC PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणेकरांना चांगले रस्ते देण्यासाठी महापालिकेने ५३ कोटींचे टेंडर काढले. पण, ही टेंडर मर्जीतील ठेकेदारांना मिळावीत यासाठी दोन माजी सभागृह नेते, आमदार यांच्यात चढाओढ सुरू आहे. ही बाब धक्कादायक असल्याने प्रशासनाने यामध्ये बघ्याची भूमिका न घेता संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

PMC Pune
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

शहरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर चांगल्यापद्धतीने होणे आवश्यक आहे. ही कामे करण्यासाठी ३०० कोटींच्या टेंडरद्वारे होणार आहेत. परंतु, ही कामे मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी अडथळे आणून टेंडर प्रक्रियेला उशीर करत आहेत. त्यामुळे यातून लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. राजकीय दबाव झुगारून हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करून कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी अर्बन सेलचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.

PMC Pune
नाशिकरांसाठी 2 गुड न्यूज! आता मुंबई, पुण्याला जायची गरज नाही, कारण

पथ विभागाकडून प्रत्येक रस्त्यासाठी स्वतंत्र टेंडर काढले जाते, पण यावेळी १० ते १५ रस्त्यांचे पॅकेज तयार करून एकत्र टेंडर काढली आहेत. या टेंडरमुळे केवळ मोठे ठेकेदार समोर येणार, परिणामी यात निकोप स्पर्धा होणार नाही. सध्याच्या राजकीय दबावामुळे किमान १० कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व खातेप्रमुख, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात व पॅसेजमध्ये सीसीटीव्ही बसवा, अशी मागणी कदम यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com