Pune: धक्कादायक! पुणे-नगर रस्त्यावर अपघात वाढले; कारण...

Nagar Road
Nagar RoadTendernama

पुणे (Pune) : पुणे-नगर रस्त्यावरील (Pune - Nagar Road) वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सद्यःस्थितीत याची क्षमता ५० हजार पीसीयू (पॅसेंजर कार युनिट) इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात ७५ हजार पीसीयू (पॅसेंजर कार युनिट) इतकी वाहने रोज धावत आहे. परिणामी, येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे.

Nagar Road
Good News : नागपूर महापालिकेत बंपर भरती; तब्बल 'एवढ्या' जागांसाठी

'आरटीओ’चे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या पथकाने बुधवारी नगर रस्त्यावरील खराडी चौक ते घोडनदी पूल दरम्यानच्या भागाची पाहणी केली. यामध्ये आढळून आलेल्या बाबींचा ‘आरटीओ’कडून अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार पीडब्ल्यूडीकडून कामे केली जाणार आहेत. तसेच या रस्त्यासह आरटीओ प्रशासन पुण्याशी जोडलेल्या अन्य महत्त्वाच्या रस्त्यांचेही लवकरच सर्वेक्षण करणार आहे.

पाहणीत आढळलेल्या बाबी

नगर रस्त्यावर महिन्याला सरासरी २० फेटल अपघात होतात. पुणे-शिक्रापूर दरम्यान रस्ता सहापदरी झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नगर रस्त्यावर वाघोली, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव भीमा अशी मोठी गावे आहेत. या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. तसेच, या ठिकाणी रस्त्यावर वाहने लावली जातात. त्यामुळे वाहनांना पाठीमागून धडकण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, अनेक ठिकाणी दुभाजक फुटल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांचे अपघात होत आहेत. तसेच मुख्य गावांमध्ये सेवा रस्ते नसल्याचे आढळून आले आहे.

Nagar Road
Nashik : अनेक वर्षे प्रलंबित सटाणा बायपाससाठी अखेर 135 कोटी मंजूर

या उपाययोजनांची गरज

- वेग वाढत असलेल्या ठिकाणी रम्ब्लर स्ट्रीप, ब्लिंकर बसवावे लागणार

- रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची आवश्यकता

- रस्त्यावर वाहने लावली जाऊ नये यासाठी कारवाई

- पीएमपी थांबे वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने उभारणे

- रस्त्यावर पार्किंग प्लाझा तयार करावा लागणार

ही आहेत धोक्याची ठिकाणे

कोरेगाव भीमा वळण, रांजणगाव एमआयडीसी चौक, शिक्रापूर चौक, सणसवाडी चौक, रांजणगाव येथील चढाचा व वळण असलेला रस्ता, लोणीकंद पोलिस ठाण्याजवळील वळण

Nagar Road
Nashik: आधीच्याच स्मार्ट गावांना ZP पुन्हा करणार स्मार्ट व्हिलेज

आरटीओ व पीडब्ल्यूडीच्या अधिकऱ्यांनी पुणे-नगर रस्त्याचे एकत्रित सर्वेक्षण केले असून, याचा अहवाल दोन दिवसांत दिला जाणार आहे. काही उपाययोजना तत्काळ करणे गरजेचे आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com