Pune : कित्येक पावसाळे आले अन् गेले; पण 'या' रस्त्याचे काम काही होईना

Potholes (File)
Potholes (File)Tendernama

पुणे (Pune) : महाळुंगे (पाडाळे) ते नांदे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आधीच येथे खड्डे (Potholes) पडलेले असून, पावसामुळे चिखल झाल्याने वाहन चालविणे जिकिरीचे बनले आहे. महाळुंगेहून नांदे, चांदे, पिरंगुट, घोटावडे, पौडकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महाळुंगेवासीयांची गैरसोय होत आहे.

Potholes (File)
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या 'त्या' निर्णयाला स्थगिती! सरकार बॅकफूट वर

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना महामार्गावरून, तापकीर वस्ती सूसमार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय आर्थिक भुर्दंड बसत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. महाळुंगे ते नांदे दरम्यान लोकवस्ती वाढत असताना हा रस्ता होणे आवश्यक आहे. परंतु, बांधकाम विभागाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने या रस्त्याचे काम रखडल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

Potholes (File)
Nashik : समृद्धीच्या कामामुळे जिल्हा परिषद रस्त्यांचे 15 कोटींचे नुकसान

या रस्त्याचे काम झाल्यास नांदे, महाळुंगे-बाणेरचा प्रवास सोयीचा होऊन मुळशीकडे जाणेही सुकर होणार आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, पाऊस असल्याने रस्त्याचे काम करता येत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. कित्येक पावसाळे गेले, परंतु आजपर्यंत रस्त्याचे काम न होता केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Potholes (File)
Pune-Nashik Railway : चौथ्यांदा मार्ग बदलणार?; काय आहे कारण...

पावसाळ्यामुळे सध्या रस्त्याचे काम करता येत नसल्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून पाऊस थांबल्यावर लवकरात लवकर काम करण्यात येईल.

- मधुकर भिंगारदिवे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले असून या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासंदर्भात सर्व स्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर काम करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- निकिता रानवडे, सरपंच, नांदे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com