Pune Ring Road: जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितला पुणे रिंग रोडचा मुहूर्त?

Purandar International Airport: पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी चर्चेतून मार्ग काढणार
पुणे रिंग रोड बातमी
Ring RoadTendernama
Published on

पुणे (Pune): निसर्गाने पुणे जिल्ह्याला भरभरून दिले आहे. जगभरातील पर्यटक आकर्षित होतील, अशी विविधता आणि नैसर्गिक समृद्धी आहे. हे लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाने पर्यटन आराखडा तयार केला आहे. त्याची अल्पावधीतच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिली.

पुणे रिंग रोड बातमी
Pune: जमिनींच्या पोटहिश्श्यांबाबत 'भूमी अभिलेख'ने काय घेतला निर्णय?

रिंगरोड, पुरंदर विमानतळ, पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणे, हिंजवडीसाठी सुविधा आदींबाबत जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची डुडी यांनी माहिती दिली. पुणे जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र विस्ताराला मुबलक संधी आहे, असे सांगून डुडी यांनी जिल्हा प्रशासन करत असलेल्या पर्यटन आराड्याची माहिती दिली.

ते म्हणाले, ‘‘पुणे जिल्हा आकाराने मोठा आहे. येथे सर्व प्रकारचे पर्यटन उपलब्ध आहे. परंतु, त्याचे जगापुढे प्रभावीपणे सादरीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटन आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, तेथे जायचे कसे, तेथील वैशिष्ट्ये, साहसी क्रीडा प्रकार, त्यांची माहिती, तेथे उपलब्ध असलेल्या सुविधा, गाइड आदींचा त्यात समावेश आहे. हा आराखडा अंतिम झाल्यावर ऑनलाइनही तो उपलब्ध असेल.’’ या पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या निवासाच्या व्यवस्थेबाबतही त्यात मार्गदर्शन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

पुणे रिंग रोड बातमी
हिंजवडी आयटी पार्कचा पुन्हा 'वॉटर पार्क' होणार? Devendra Fadnavis काय आदेश देणार?

‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर सायकल स्पर्धा

फ्रान्समधील ‘टूर द फ्रान्स’ या सायकल स्पर्धेच्या धर्तीवर पुण्यातही नागरिकांच्या सहकार्याने तब्बल ७०० किलोमीटरची सायकल स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सायकल शर्यतींच्या आंतरराष्ट्रीय नकाशावर पुणे झळकेल. जिल्ह्यातील नऊ तालुके २५० गावांतील पर्यटनस्थळांमधून स्पर्धेचा मार्ग असेल. आंतरराष्ट्रीय सायकलीस्ट संघटनेच्या स्पर्धेच्या वेळापत्रकातही स्पर्धेचा समावेश व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करत असून त्यात अल्पावधीत यश मिळेल. या स्पर्धेसाठी जगभरातून सायकलपटू भाग घेतील. लोकसहभागातून स्पर्धा दरवर्षी होणार आहे. तसेच, स्पर्धेतील विजेते ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील, अशा पद्धतीने सायकलींग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मदतीने नियोजन करण्यात येत आहे. जगभरातील सायकलटपटूंना स्पर्धा आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेच्या संयोजनात राज्य सरकारचा मोलाचा सहभाग असेल, असेही डुडी यांनी स्पष्ट केले.

पुणे रिंग रोड बातमी
आता जिरायती 20 गुंठे, बागायती 10 गुंठ्यांच्या आतील खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंद अशक्य; कारण...

डुडी म्हणाले...

- पुण्यातील वाहतूक प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका एकत्र काम करणार

- रिंगरोडचे काम अडीच वर्षांत पूर्ण होणार

- पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी चर्चेतून मार्ग काढणार

- हिंजवडीच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार

- धरणक्षेत्रांतील सुमारे ३०० अतिक्रमणे काढणार; प्रक्रिया सुरू

- गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणार

- लोहगाव विमानतळाभोवतालचा कचरा दूर करण्यासाठी महापालिकेशी संवाद सुरू

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com